लॉकडाउनमध्ये विनाकारण फिरले अन् लाखाचा भरला दंड

ek lakhacha dand
ek lakhacha dand
Updated on

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाउन, संचारबंदी लागू असतानाही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे मंगळवारी दिवभरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करत २७० वाहने ताब्यात घेतली. या कारवाईतून वाहतूक शाखेने एक लाख आठ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी दिली.


जिल्ह्यात आतापर्यंत दीड महिन्यात तीन लॉकडाउनचे टप्पे झाले आहेत. आता चौथा टप्प्याला सुरवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने अठरा मेपासून बहुतांश आस्थापनांना मुभा दिली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

 काही नागरिक काम नसतानाही विनाकारण फिरत आहेत. यापूर्वी अनेक वेळा वाहतूक शाखेने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत दंडही वसूल केला आहे. तरीही पुन्हा लॉकडाउनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने वाहतूक शाखेने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी कारवाई केली. 

१५० वाहने पोलिसांनी जप्त

यात २७० वाहनांवर कारवाई करून एक लाख आठ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, भाजीपाला, किराणा खरेदीसाठी पायी येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेक नागरिक वाहने घेऊन येत आहेत. अशी १५० वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

लॉकडाउन संपल्यानंतरच मिळणार जप्त वाहने

आतापर्यंत जवळपास १५० वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त केलेली वाहने सोडवून घेण्यासाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी करू नये, लॉकडाउन संपल्यानंतरच वाहने घेऊन जावीत, असे आवाहन श्री. चिंचोलकर यांनी केले.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

गिरगाव (ता. वसमत) : पिंपराळा (ता. वसमत) येथे विवाहित महिलेने सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (ता. १९) घडली. या बाबत सासरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकास ताब्यात घेतले आहे.

दोन लाख रुपये हुंड्याची मागणी

कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंपराळा येथील प्रणाली आतिष कदम (वय २४) या विवाहितेला पती आतिष व सासूने दोन लाख रुपये हुंड्याची मागणी करून छळ केला. त्‍यामुळे प्रणाली यांनी या त्रासाला कंटाळून मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता गळफास लावून आत्‍महत्या केली. 

एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

या बाबत सदाशिव कल्याणकर (रा. तरोडा खुर्द, ता., जि. नांदेड) यांच्या फिर्यादीवरून पती आतिष व सासूच्या विरोधात कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. यातील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. गोपीनवार पुढील तपास करीत आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action
Maratha Quota
Marathi News Esakal
www.esakal.com