

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. रब्बी पिकं, द्राक्षे, केळीच्या बागां कोलमडून पडल्या आहेत. हिंगोलती गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचा फटका वसमत तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. एका महिला शेतकऱ्याने दोन गटांतून पैसे काढून केळीच्या बागेत लागवड केली होती. पण पावसाने सगळी केळीची बाग भुईसपाट झालीय. यामुळे हतबल झालेल्या शेतकरी शिलाताई नादरे यांनी सरकारकडे मदतीसाठी आर्त हाक दिलीय.