बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारांमुळे फळपिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

बीड परिसरातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. तसेच पाटोदा व आष्टी तालुक्यातही पाऊस झाला. पावसामुळे टरबूज, खरबूज या फळपिकांसह टोमॅटोचेही मोठे नुकसान झाले. वादळ व गारांमुळे अंबा, पपई या पिकांचेही नुकसान झाले.

बीड - जिल्ह्यात रविवारी (ता. दहा) दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागचे पंधरदिवस प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसे आल्हाददायक वाटले. परंतु, वादळ, गारपिट यामुळे फळपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. मागच्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाने ४२ अंशांचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासून उन आणि उकाडा होता. दुपारनंतर अचानक आभाळ यायला सुरवात झाली.

बीड परिसरातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. तसेच पाटोदा व आष्टी तालुक्यातही पाऊस झाला. पावसामुळे टरबूज, खरबूज या फळपिकांसह टोमॅटोचेही मोठे नुकसान झाले. वादळ व गारांमुळे अंबा, पपई या पिकांचेही नुकसान झाले.
आष्टी शहर व परिसरात रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा - शेती, शेतकरी आणि कोरोना....असे बदललेय ग्रामीण जीवन  

तुरळक प्रमाणात गारपीटही झाल्याने नुकसान झाले नसले तरी गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागलेल्या आष्टीकरांनी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सुटकेचा निश्वास टाकला. उष्णतेमुळे लॅकडाऊनमुळे घरातच अडकून पडलेल्या नागरिकांना दिवसभर कुलर, पंख्याचा आसरा घ्यावा लागत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाबरोबरच वातावरणातील उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन जोरदार पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धा-पाऊण तास पडलेल्या या पावसाने घरावरील पन्हाळी व नाल्या भरभरून वाहिल्या. काही प्रमाणात नायलॅन शाबुदाण्याएवढ्या आकाराच्या गाराही पडल्याने बच्चेकंपनीच्या पावसात भिजण्याच्या आनंदाला उधान आल्याचे चित्र होते. गारपीट व पावसाने नुकसान झाले नसले तरी तीव्र उन्हाचा चटका सहन करणाऱ्या आष्टीकरांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Untimely rains in Beed district, damage to fruit crops