UP Gangster Act: यूपीच्या कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त..

Illegal property seizure linked to Vijay Mishra case: उत्तर प्रदेश पोलिसांची महाराष्ट्रात धडक कारवाई; गँगस्टर विजय मिश्रा याच्या उमरगा औद्योगिक वसाहतीतील दाल मिलसह १०० कोटींच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जप्तीची टाळेबंदी
UP Gangster Act Invoked: Maharashtra Seizes ₹100 Crore Worth of Properties

UP Gangster Act Invoked: Maharashtra Seizes ₹100 Crore Worth of Properties

esakal

Updated on

अविनाश काळे,

​उमरगा : उत्तर प्रदेशातील कुप्रसिद्ध गँगलीडर विजय मिश्रा याच्या बेकायदेशीर साम्राज्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रात मोठा धक्का दिला आहे. भदोही जिल्ह्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (जिल्हा मॅजिस्ट्रेट) आदेशानुसार, मिश्राची महाराष्ट्रातील तब्बल १०० कोटी २५ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त (कुर्क) करण्यात आली आहे. या धडक कारवाईचा भाग म्हणून, उमरगा-लातूर रस्त्यावरील जकेकुर (ता. उमरगा) येथील औद्योगिक वसाहतीमधील एका मोठ्या दाल मिल कंपनीवर मंगळवारी (ता. सात) जप्तीची टाळेबंदी ठोकण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com