उपसरपंचाला सरपंचाच्या पतीकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

वाळूज - तीसगाव येथील उपसरपंचाला सरपंचाच्या पतीने मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. २०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात घडली. 

वाळूज - तीसगाव येथील उपसरपंचाला सरपंचाच्या पतीने मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. २०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात घडली. 

तीसगाव येथील सरपंच व उपसरपंच यांच्यासह अकरा जण शिवसेनेचे आहेत; मात्र त्यांच्यात एकमत नाही. त्यामुळेच अन्य सदस्यांनी हस्तक्षेप करून गेल्या काही महिन्यांपूर्वी उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मांडला होता. तेव्हापासून सरपंच व उपसरपंच यांच्यातील दरी वाढली. पोलिस तक्रारीनुसार, रविवारी उपसरपंच विष्णू जाधव ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त गेले होते. त्या वेळी सरपंचाचे पती रामचंद्र कसुरे तेथे आले. त्यांच्यात वाद होऊन कुसरे यांनी जाधव यांना कार्यालयात कोंडून मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

सरपंच पतीचीही पोलिसांत धाव  
उपसरपंच जाधव यांनी तक्रार देताच सरपंचाचे पती कसुरे यांनीही पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी म्हटले, ते ग्रामपंचायतीजवळून जात असताना जाधव यांनी मला पाहून टोमणा मारला; तसेच सरपंचाविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे हा प्रकार घडला; मात्र कार्यालयात कोंडून मारहाण केली हे खोटे आहे.

Web Title: Upsarpanch beat from Sarpanch husband