जवळाबाजार येथे पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

जवळाबाजार : जवळबाजार (ता. औंढा) येथील पोलिस चौकीमधे गोंधळ घालून पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर सोमवारी (ता. 21) सकाळी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे रविवारी (ता. 20) रात्री दोन गटात हाणामारी झाली होती. त्यातील एक गट तक्रार देण्यासाठी जवळाबाजार पोलिस चौकीमधे आला होता. तर दुसरागट हिंगोली येथे गेला होता. रात्री उशीरा जवळाबाजार पोलिस चौकीमधे उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर व इतर कर्मचारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करीत असतांना असोला येथील विनोद उत्तमराव झोडगे, उत्तम झोडगे व अन्य दोघांनी पोलिस चौकीमधे गोंधळ घातला.

उपनिरीक्षक मुलगीर यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी चक्क उपनिरीक्षक मुलगीर व अन्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी मुलगीर यांनी हट्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चौघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: use abusing word to PSI in javalabazar