लिंबाचीवाडी रस्त्यासाठी निकृष्ट प्रतीच्या खडीचा वापर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

बीड - दहिफळ वडमाऊलीअंतर्गत लिंबाचीवाडी (ता. केज) रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी निकृष्ट प्रतीची खडी वापरण्यात येत असल्याचा आरोप केज पंचायत समितीचे सदस्य पिंटू ठोंबरे यांनी केला आहे. यासंदर्भाने अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारही त्यांनी केली आहे; मात्र अद्यापपर्यंत बांधकाम विभागाने कसलीही दखल घेतलेली नाही. 

लिंबाचीवाडी रस्त्याचे काम जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून होत आहे. संबंधित काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्ता कामात खडी वापरण्याची परवानगी नसतानाही ती वापरली जात आहे. काम करणारे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. याविषयी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.नखाते व अभियंता श्री. कोळगे यांच्याशी संपर्क साधून लिंबाचीवाडी रस्ताकामाचे फोटो व व्हीडीओ शुटिंग पाठवूनही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ठोंबरे यांनी अखेर अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी निकृष्ट दर्जाच्या कामाला पाठीशी घालणाऱ्या दोन्ही अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र तक्रारीनंतरही अद्यापपर्यंत बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही. 

लिंबाचीवाडी रस्ताकाम नुकतेच सुरू झाले आहे. हे काम निकृष्ट पद्धतीचे होणार नाही याची काळजी घेतली जाईल. 
- एस. एन. नखाते, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, केज. 

Web Title: The use of the over macadam road degradation