उन्हापासून संरक्षणासाठी असाही प्रयोग!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

अंबाजोगाई - ‘करा फोन अन्‌ मागवा चहा व सरबत’ अशी सेवा देणारे अंकुश माने यांनी उन्हापासून संरक्षणासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या दुचाकीवर छत तयार करून डोक्‍यावर सावली केली आहे. ही दुचाकी शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

अंबाजोगाई - ‘करा फोन अन्‌ मागवा चहा व सरबत’ अशी सेवा देणारे अंकुश माने यांनी उन्हापासून संरक्षणासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या दुचाकीवर छत तयार करून डोक्‍यावर सावली केली आहे. ही दुचाकी शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

सध्या दररोज उन्हाचा पारा ४० अंशांवर जात आहे. यामुळे अनेकजण घराच्या बाहेर पडताना रूमाल, पांढरा गमजा, टोप्यांचा वापर करू लागले आहेत. परंतु, दुचाकीवर जाणारांनी डोक्‍यावर रूमाल बांधला तरी सीट गरम होते. हातालाही उन्हाचे चटके बसतात. नेहमी दुचाकीवर व्यवसायासाठी फिरणारांना याचा मोठा त्रास होतो. म्हणून दुचाकीवर चहा व थंड लिंबू सरबताची सेवा देणारे अंकुश माने यांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या दुचाकीला पुढे व मागच्या चाकावर लोखंडी गज लावून छत तयार केले आहे. यामुळे दुचाकीच्या संपूर्ण सीटवर सावली झाली आहे. दिवसभर चहा व सरबताच्या ऑर्डर पोचवण्यासाठी त्यांची ही चांगली सोय झाली आहे. त्यांच्या या दुचाकीला छत बघून रस्त्याने अनेकजण त्यांच्याकडे कुतुहलाने बघू लागले आहेत. 

उन्हाचा त्रास वाचला
दुचाकीवर फिरून भर उन्हात चहा व सरबत पोचविणे कठीण झाले होते. त्यामुळे बाराशे रुपये खर्चून दुचाकीवर सावलीसाठी छत तयार केले. आता डोक्‍यावर सावली झाल्याने उन्हाचा त्रास कमी झाला आहे.

पाच वर्षांपासून घरपोच सेवा
अंकुश माने हे मागील पाच वर्षांपासून चहाचा व्यवसाय करतात, तुम्ही शहरात कुठेही असा, फोन करा अन्‌ चहा मागवा. दहा मिनिटांत तुमच्यापर्यंत गरम चहा पोचविण्याची सेवा ते देतात. उन्हाळ्यात चहा बरोबरच ते थंड लिंबू सरबतही पोचवतात. दुचाकी हेच त्यांचे मुख्य व्यवसायाचे साधन आहे. आपल्या घरूनच ते चहा बनवून आणतात. फोन आला की तत्पर सेवा देण्यावर त्यांचा भर असतो. 

Web Title: Use protection from heat

टॅग्स