थंडी पडलीय... अशी घ्या त्वचेची काळजी

योगेश पायघन
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

थंडीत अगोदरच असलेले त्वचेचे आजार, सोरायसिस, एक्‍झिमा आदी आजार पूर्वीपेक्षा वाढतात. त्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेतले पाहिजेत. तसेच थंडीत त्वचेला ड्रायनेस येतो. त्यामुळे त्वचा अतिशुष्क होते. त्याकरिता चांगला साबण, लोशन, क्रीम वापरण्याचा सल्ला घाटीचे त्वचारोग विभागप्रमुख डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिला.

औरंगाबाद : शहरात थंडीचा गारठा वाढायला सुरवात झाली. अशा वातावरणात नाजूक त्वचेला जपले पाहिजे. हिवाळा असला तरी आठ ते दहा ग्लास पाणी प्या. आवश्‍यकतेनुसार मॉइश्‍चराईज्ड्‌ अन्‌ सनस्क्रीमही वापरा. शिवाय ज्येष्ठांसह शिशूंची आवश्‍यक ती काळजी घेण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.

हे वाचाच(व्हिडीओ पाहा) जालना जिल्ह्यात तब्बल 400 किलो गांजा जप्त;ओडिसा राज्यातून होतेय...

थंडीत अगोदरच असलेले त्वचेचे आजार, सोरायसिस, एक्‍झिमा आदी आजार पूर्वीपेक्षा वाढतात. त्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेतले पाहिजेत. तसेच थंडीत त्वचेला ड्रायनेस येतो. त्यामुळे त्वचा अतिशुष्क होते. त्याकरिता चांगला साबण, लोशन, क्रीम वापरण्याचा सल्ला घाटीचे त्वचारोग विभागप्रमुख डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिला.

क्लिक करा माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

थंडीच्या दिवसांत टीएफएम हा घटक 76 टक्केपेक्षा जास्त असेल असा साबण निवडा. टीएफएम हे साबणाच्या कव्हरवर लिहिलेले असते. ते पाहून साबण निवडा. मॉइश्‍चरायझिंग क्रीममध्ये सेरामाईड, सिया बटर, होल्युरोनिक ऍसिड आणि इसेन्शियल फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त आहे, हे पाहा. हे क्रीम लावताना अंघोळीनंतर त्वचा ओलसर असताना लावा. हिवाळ्यात जास्त वेळ अंघोळ करू नका. शिवाय अंघोळीला कोमट पाणी वापरा. ओठांच्या काळजीसाठी तूप किंवा लीप बाम लावा. त्यात फ्लेव्हर्ड लीप बाम टाळा, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिला आहे.

हेही वाचाबीडमध्ये पोलिसांसह वाहनांवर दगडफेक : अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

अशी घ्या लहान मुलांची काळजी

लहान मुलांची थंडीत जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांची त्वचा जास्त नाजूक असते. त्यामुळे दिवसातून दोनवेळा पूर्ण अंगाला मॉइश्‍चरायझिंग क्रीम लावा. त्यांना स्वेटर घालताना अगोदर कॉटनचे कपडे आतमध्ये घाला. जेणेकरून स्वेटरमुळे खाज येणार नाही. त्यामुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात.

शक्यतो आहारात हे घ्या...

हिवाळ्यात स्निग्धता वाढविणाऱ्या पदार्थांना आहारात प्राधान्य दिले गेले पाहिजे. मात्र, ते खाताना शरीरासाठी योग्य - अयोग्य विचार करावा. खाण्यात ड्रायफ्रुट, फिश, जवस यांसारख्या पदार्थांतून त्वचेला स्निग्धता मिळते. मात्र, इतर व्याधी व आजार असतील तर त्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. टाकळकर म्हणाले.

हे वाचलंत का?- ...तर झाडे तोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी फटके दिले असते! - शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use soap, cream and preserve skin in winter