'वीस वर्षांपासून रखडलेल्या साठवण तलावाचे काम मार्गी लागणार'

नीळकंठ कांबळे
Saturday, 23 January 2021

तालुक्यातील वडगाव (गांजा) येथील साठवण तलाव प्रकल्पास २००० मध्ये जलसंपदा विभागाने मंजुरी दिली होती

लोहारा (जि. उस्मानाबाद): तालुक्यातील वडगाव (गांजा) येथील  साठवण तलावाचे पुर्नसर्वेक्षण करून निधीची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला. हा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे वीस वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील सुमारे ३५० हेक्टरवर शेत जमीन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

तालुक्यातील वडगाव (गांजा) येथील साठवण तलाव प्रकल्पास २००० मध्ये जलसंपदा विभागाने मंजुरी दिली होती. त्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया बऱ्याच अंशी पूर्ण होऊन जवळपास ७० टक्के लोकांना भूसंपादनापोटी मावेजाही देण्यात आला होता. परंतु काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तलावाचे काम मागील वीस वर्षापासून रखडले होते.

' काँग्रेस जळकोट नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार '

या प्रकल्पाला चालना देण्यासाठी आमदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते, त्याचबरोबर आमदार ज्ञानराज चौगुलेही या बैठकीस उपस्थित होते. मागील वर्षी राज्य शासनाच्या निर्णयानुसार १०१ ते ६०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या पाणीसाठ्यांचे प्रकल्प जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले.

Gram Panchayat Election: उदगीर तालुक्यात सरपंचपदाची सोडत लवकरच

त्यानुसार वडगाव (गांजा) येथील साठवण तलावाचे जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. प्रकल्प पूर्ण झाल्यास या ठिकाणी १.६३ दलघमी पाणीसाठा होऊन सुमारे ११ चौ. किलो मीटर क्षेत्रातील जवळपास ३५० हेकटर जमीन ओलिताखाली येणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रकल्पाचे पूर्ण सर्वेक्षण करून उर्वरित भूसंपादन करून नव्याने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय  बैठकीत झाला. प्रकल्पासाठी लागणारा निधी जलसंधारण विभागाकडून मंजूर करून तो पूर्णात्वाकडे नेण्याची ग्वाही आमदार चौगुले यांनी यावेळी दिली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: usmanabad latest news lohara breaking news sathvan lake