प्रेरणादायी! अंध विद्यार्थ्याची शिक्षणासाठीची प्रबळ इच्छाशक्ती ठरतेय कौतुकाचा विषय

umarga
umarga

उमरगा (उस्मानाबाद): जग दिसण्याचं स्वप्न अंपगात्वाने हिरावून घेतल्याचं शल्य असले तरी आयुष्यातील अंधाराची वाटचाल प्रकाशमय करण्याची जिद्द बाळगणाऱ्या एका गरिब कुटुंबातील अंध मुलाची कहाणी प्रेरणादायी आहे.
शहरातील रहिवाशी असलेला मदन कालीदास कांबळे हा जन्मजात दोन्ही डोळ्याने अंध आहे, तो जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

आई - वडिल मोलमजुरी करतात. जगण्याचं साधन काबाडकष्टाशिवाय शक्य नाही. त्यात मदनच्या अंधत्वाची चिंता आईवडिलांसमोर आहे पण त्याला न डगमगता मदनला शिक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मदनची जिद्द आणि संघर्षही महत्वाचा ठरतो आहे. मदनने पहिली ते चौथीपर्यंत शहरातील आदर्श विद्यालयात शिक्षण घेतले. पाचवी ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले त्यानंतर तो आठवीपासून येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी आला.

मदन सध्या दहावी वर्गात शिक्षण घेत आहे. लॉकडाउनमध्ये त्याने मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेतले. आता वर्ग सुरू झाल्याने तो नियमित शाळेत येतोय. आई अनिता ही मदनला दररोज शाळेत आणते आणि शाळा संपल्यानंतर घरी घेऊन जाते. दरम्यान वर्गातील फलकावरील बोलके चित्र मदनच्या दृष्टीला शक्य होत नाही मात्र तो शिक्षकाच्या अध्यापनातील बारकाव्याचे कटाक्षाने श्रवण करतो. मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सहशिक्षक धनराज तेलंग, बशीर शेख आदी शिक्षक त्याला नेहमी प्रोत्साहन देतात. मोबाईल टिचर श्री. बोडरे यांचे मदनला नेहमी मार्गदर्शन मिळते.

" नशीबाने अंधत्व आले तरी शिक्षण घेऊन नौकरीची संधी मिळण्यासाठी माझा प्रवास सुरू आहे. आई, वडिल, गुरुजणाचे प्रोत्साहन आणि  शासनाच्या उपक्रमातून ब्रेन लिपीचे माध्यम महत्वपूर्ण ठरत आहे. मोबाईलमध्ये अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यात आला आहे, त्यातून मी श्रवण करतो. दहावीची परिक्षा माझ्या बुद्धिमत्तेतून सहाय्यकच्या मदतीने चांगल्या गुणाने उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न रहाणार आहे." - मदन कांबळे, विद्यार्थी
 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com