अवैध धंद्यांना चाप बसवा

नेताजी नलवडे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

हे अवैद्यधंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने वाशी तालुक्याची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे अवैद्य धंद्यावर आपण वेळीच लक्ष देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन पुढील अनर्थ टाळावा. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर त्वरीत कारवाई न झाल्यास आम्हाला पुढील मार्ग मोकळा असेल

वाशी  जि.उस्मानाबाद - तालुक्यात सुरु असलेला मटका, गावठी दारु व पत्त्यांचे  क्लब आदि अवैद्य धंदे बंद करण्याच्या मागणिचे निवेदन वाशी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस निरिक्षक श्री दिनकर डंबाळे यांना आज (शुक्रवार) देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात मागिल अनेक दिवसापासुन अवैद्य धंद्याने थैमान घातलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने मटका, गावठी दारु व पत्त्यांचे क्लब अनधिकृत देशी, विदेशी दारु आदि अवैद्यधंदे तालुक्यात राजरोसपणे सुरु आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.हे अवैद्यधंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने वाशी तालुक्याची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे अवैद्य धंद्यावर आपण वेळीच लक्ष देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन पुढील अनर्थ टाळावा. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर त्वरीत कारवाई न झाल्यास आम्हाला पुढील मार्ग मोकळा असेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

निवेदनावर तालुका अध्यक्ष सचिन इंगोले नगसेवक सुरेश कवडे पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मीकांत आटुळे, राजगुरु कुकडे, नवनाथ मोटे, बबन कवडे, अण्णासाहेब गव्हाणे, संतोष गादेकर, सुहास चौगुले, अण्णासाहेब चौधरी, प्रदिपसिंह ठाकुर, विजय तळेकर, हौसेरव जाधवर, बाळासाहेब पाटील, विश्वासकाका क्षिरसागर, दिलीपराव उंदरे किरण डांगे आदि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Web Title: usmanabad news: bjp