लोकशाही म्हणजे काय, हे शिकवले गेले नाही - उत्तम कांबळे

लातूर - पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेत उत्तम कांबळे यांनी मंगळवारी उपस्थितांशी संवाद साधला.
लातूर - पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेत उत्तम कांबळे यांनी मंगळवारी उपस्थितांशी संवाद साधला.

लातूर - स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोणती लोकशाही स्वीकारली आणि सध्या कोणती लोकशाही अवलंबत आहोत? लोकशाही हा सध्या ताकदीचा, घराणेशाहीचा विषय बनला आहे. राजकारणातच काय जगण्या-वागण्यातही लोकशाही कुठं दिसत नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. खरंतर लोकशाही म्हणजे काय, हे आपल्याला गेल्या ७० वर्षांत नीट कोणी शिकवलेच नाही, असेही ते म्हणाले.

पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेची मंगळवारी (ता. २३) सांगता झाली. या वेळी उत्तम कांबळे यांनी आजचे भारतीय राजकारण या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. प्रायोजक दीपक खिस्ती, आर. व्ही. जोशी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, ज्या देशात लोकशाहीवादी नागरिक जन्माला येतात त्या देशात लोकशाही टिकून राहते. त्यासाठी आवश्‍यक साक्षरता आपल्याला तयार करावी लागते. तशी साक्षरता आपण तयार करत आहोत का? ती करत नसल्यामुळेच नेतेकेंद्रित लोकशाही जन्माला आली आहे. तीच-तीच माणसे आपण सातत्याने निवडून देत आहोत. याचा अर्थ आपल्या डीएनएमधील गुलामी अद्याप संपली नाही. राजा, सरदार, नेता असेल तरच आपले कल्याण ही वृत्ती अजूनही शिल्लक आहे. खरंतर लोकशाहीत सर्वसामान्य माणूस सर्वश्रेष्ठ आहे, याचाच आपल्याला विसर पडला आहे.

जातीची प्रतिष्ठा वाढली
जातिव्यवस्था गाडून टाकण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. असे असताना गेल्या चार वर्षांत जातीला प्रतिष्ठा देण्याचे प्रयत्न झाले. इतकेच नव्हे तर या कालावधीत जितक्‍या क्रूर घटना घडल्या आहेत, तितक्‍या गेल्या ७० वर्षांत कधीही घडल्या नाहीत, अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com