Nanded Census : नांदेड जिल्ह्यातील पहिले शंभर टक्के स्वगणना गाव ठरले अर्धापूर तालुक्यातील वाहेदपूरवाडी

नांदेड जिल्ह्यातील वाहेदपूरवाडीची शंभर टक्के स्वगणना; आधुनिक तंत्रज्ञानाधारित जनगणनेत जिल्ह्यातील पहिले आदर्श गाव
National Census 2027: Vahedpurwadi Leads with 100% Self-Enumeration

National Census 2027: Vahedpurwadi Leads with 100% Self-Enumeration

Sakal

Updated on

अर्धापूर : (जिल्हा नांदेड) देशभरात जनगणना २०२७ ची तयारी सुरू असून या जनगणनेचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा करण्यात येणार वापर. देशभरात एक मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वगनना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांनी केले आहे.या आवाहनाला नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.अर्धापूर तालुक्यातील वाहेदपूर या गावाने जिल्ह्यात बजी मारली असून स्वगणना करणारे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.या गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन शंभर टक्के स्वगनना करत राष्ट्रीय कार्यांत सहभागी झाले आहेत.या गावातील नागरिकांचे प्रशासानाच्या वतीने अभिनंदन केले असून या गावाचा आदर्श घेऊन इतर गावांतील नागरिकांनी स्वगणना करावी असे आवाहन तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com