Vaijapur Crime : खळबळजनक! लोणीखुर्द मध्ये दगडावर डोके अपटुन महिलेची हत्या

लोणीखुर्द येथे एका महिलेचे डोके दगडावर अपटुन हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.१९) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली
Vaijapur Crime
Vaijapur Crimesakal

Vaijapur Crime: तालुक्यातील लोणीखुर्द येथे एका महिलेचे डोके दगडावर अपटुन हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.१९) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच तपासाचे चक्र फिरवित एका संशयीत आरोपीस अटक केली आहे.

अनुसयाबाई दामु जाधव (वय ७५) अशी हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान,घटनेनंतर सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, शिउर पोलिस ठाण्याचे एपीआय संदीप पाटिल यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाचे चक्र फिरवल्यानंतर मयत महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या एका संशयीत आरोपीस अटक केली आहे.

दरम्यान,ही घटना चोरिसाठी नव्हे तर दारुच्या नशेत महिलेवर अतिप्रसंग करण्याला विरोध केल्याने महिलेची हत्या करण्यात आली असा प्राथमिक अंदाज पोलिसाकडून वर्तविन्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com