Vaijapur News : तोंडचा घास हिरावला...; लोणी खुर्द परिसरात गारपिट, वादळी वाऱ्याचा धुमाकूळ

अवकाळी पावसात हाता तोंडाशी आलेल्या फळबागा माती मोल झाल्या आहेत.अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे.
loni khurd hail storm
loni khurd hail stormsakal

- मोबीन खान

वैजापुर - आभाळ फाटलं, काळीज तुटलं, हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला असेच काहीसे विदारक चित्र तालुक्यातील लोणी खुर्द परिसरात मंगळवारी (ता. २७) दुपारी चार वाजेच्या सुमारास बघयला मिळाले. तब्बल अर्धा तास गारपिट, वादळी वाऱ्याने अक्षरश: धुमाकूळ घातला.

त्यामुळे अनेक ठिकाणी गहु आडवा पडला तर कांदेचा चिखल,पपईच्या बागा भुईसपाट झाल्याचे बघयला मिळाले.अचानक आलेल्या अवकळी पाउसामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

आंबा, टरबूज, गहू, कांदा, ज्वारी, पपई अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी अवकाळी गारांच्या पावसाने लोणीकराना चांगलेच झोडपुन काढल्याचे बघयला मिळाले. शेतकऱ्यांनी पै-पै गोळा करुन फळबागा लावल्या आहेत. अहोरात्र मेहनत करुन फळबागा जगवल्या आहेत.

मात्र, अवकाळी पावसात हाता तोंडाशी आलेल्या फळबागा माती मोल झाल्या आहेत.अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.

अर्धा तास धुमाकूळ...

लोणी परिसरात अचानक झालेल्या गारपिटीत अनेक ठिकाणी बाग जमिनदोस्त झाली आहे. पत्र्याचे शेड उडून गेले. कुठे घराच्या छतावर झाड कोसळले आश्चर्य म्हणजे, गारपिटीच्या पावसामुळे येथील रस्त्यावर पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी शेतात साठवून ठेवलेला कांदेचा अक्षरक्ष चिखल झाला आहे.त्यांमुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यां कडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com