Motivational Story : बॉल बॅडमिंटन खेळात वैष्णवीचा देदीप्यमान प्रवास ; कर्नाटकातून उदरनिर्वाहासाठी देगलुरात स्थायिक कुटुंबातील मुलीची कहाणी

वडिलांचा पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय, कुटुंबात चार बहिणींचा गोतावळा, त्यात दररोजच्या उदरनिर्वाहासाठी वडिलांना पाणीपुरी विकण्यासाठी व्यवसायात मदत करण्याची जबाबदारी, त्यातच पदवीचे शिक्षण व खेळामध्ये आवड, सर्वच बाजूने अनुकूल परिस्थिती नसतानाही तिने बॉल बॅडमिंटन खेळात रुची दाखवत असामान्य कर्तृत्व दाखवले
Motivational Story
Motivational Story sakal

देगलूर : वडिलांचा पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय, कुटुंबात चार बहिणींचा गोतावळा, त्यात दररोजच्या उदरनिर्वाहासाठी वडिलांना पाणीपुरी विकण्यासाठी व्यवसायात मदत करण्याची जबाबदारी, त्यातच पदवीचे शिक्षण व खेळामध्ये आवड, सर्वच बाजूने अनुकूल परिस्थिती नसतानाही तिने बॉल बॅडमिंटन खेळात रुची दाखवत असामान्य कर्तृत्व दाखवले. तामिळनाडूत पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन संघाच्या मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नेतृत्व करण्याची संधी तिला आपोआप चालून आली. सामान्य घरातील वैष्णवी धुळप्पा जाधव या कर्तृत्ववान मुलीची ही यशोगाथा आहे.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही एक चांगला गुण असतो आणि त्या गुणाचा विकास चाकोरीबद्द पद्धतीने केला की त्या व्यक्तीचा विकास होत असतो. वैष्णवी धुळप्पा जाधव ही मूळची कर्नाटकातील आल्लूर (ता. औराद, जि. भालकी) येथील मूळ रहिवासी. धुळप्पा जाधव व्यवसायासाठी मुली लहान असतानाच देगलूरमध्ये वास्तव्यासाठी आले. धुळप्पा यांना चार मुली. देगलूर येथे आल्यानंतर त्यांनी पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय सुरू केला तो आजातगायत सुरूच आहे. वडिलांना व्यवसायात हातभार लावण्यासाठी मुली व आई पाणीपुरीला लागणारे साहित्य घरातून बनवून देण्याचा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेलाच. अडचणीच्या वेळी स्वतः मुली पाणीपुरी विकण्यासाठी वडिलांना मदत करणे हा त्यांचा नित्याचाच क्रम बनलेला आहे .

या परिवारात वाढलेली चंचल व खेळकर वृत्तीची वैष्णवीला खेळामध्ये लहानपणापासूनच आवड होती; पण तिला शालेय जीवनात खेळासाठी संधीच मिळाली नाही. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर ती पदवी शिक्षणासाठी येथील धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात दाखल झाली. तिला लहानपणापासूनच खेळामध्ये रुची असल्याने क्रीडा संचालक प्रा.डॉ. दिलीप भडके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या अंतर्गत होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेत ती भाग घेऊ लागली. महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाच्या सरावासाठी महाविद्यालयाकडून प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली.

लहानपणापासूनच आवड आणि चिकाटी असल्याने प्रशिक्षणादरम्यान तिच्या खेळातील स्किल खूप लवकर व चांगल्या प्रकारे डेव्हलप होत गेल्याने तिने पहिल्याच वर्षी २०२३ मध्ये बॅडमिंटन बी झोन क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविले. बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेची तयारी वर्षभरापासून तिने सुरूच ठेवल्याने त्या संघात ही सहभागी झाली. मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव राजेश महाराज देगलूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके उपप्राचार्य प्रा. संजय अवधानी यांच्यासह इतरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Motivational Story
Motivation Story : मराठमोळ्या कन्येचा लष्करामध्ये डंका; मधुरा कुंजीर हिने घातली लेफ्टनंट पदाला गवसणी

विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व

बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रावीण्य मिळविले. वैष्णवी जाधव खेळाचे चांगले प्रदर्शन करीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बॉल बॅडमिंटन मुलींच्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवत तिची विद्यापीठाच्या संघात निवड झाली.

ता.२६ जानेवारी २३ मध्ये अब्दुल रहमान युनिव्हर्सिटी चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये तिने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. २०२४ मध्ये पार पडलेल्या बॅडमिंटन बी झोन क्रीडा प्रकारात तिने प्रावीण्य मिळवित झोन संघात तिने स्थान प्राप्त केले. अण्णा युनिव्हर्सिटी चेन्नईअंतर्गत पसना इन्फॉर्मेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग महाविद्यालय दिंडीगुल (तमिळनाडू) येथे ता.२१ मार्च ते २४ मार्च २०२४ दरम्यान झालेल्या अखिल भारतीय बॉल बॅडमिंटन मुलीच्या संघात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवून तिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com