‘या’ कारणासाठी गावकऱ्यांनी आवळली वज्रमुठ

Nanded News
Nanded News

नांदेड : हवामान बदलाला कारणीभूत असलेल्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी केवळ प्रसिद्धीसाठी प्रयत्न होतो आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यातील एका गावातील युवकांनी सर्व ग्रामस्थांना सोबत घेवून पर्यावरण संवर्धनासाठी वज्रमुठ आवळली. त्यांनी ‘एक झाड, एक व्यक्ती’ ही संकल्पना नुसतीच केली नाही, तर प्रत्यक्षात सुरुवातही केली आहे.

शासनातर्फे पाच वर्षांपासून राज्यभर वृक्षलावगड मोहीम सुरु केलेली आहे. पहिल्या वर्षी चार कोटी, दुसऱ्या वर्षी सहा कोटी, तिसऱ्या वर्षी सात कोटी, चौथ्या वर्षी 13 कोटी पाचव्या वर्षी (यंदा) 33 कोटी वृक्षलागवड केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचे परिणाम अजून दिसून येत नसल्याने, शासनाची ही योजना म्हणजे पैशांची उधळण करणारी ठरली आहे. या योजनेला नांदेड जिल्ह्यातील एका गावातील युवकांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या वतीने एक झाड एक व्यक्ती हा संकल्प करून, शासनाच्या या वृक्ष लागवड अभियानला एकप्रकारे आव्हानच दिले आहे.

 उंचाडा (ता. हदगाव) हे कलिंका देवीच्या पुरातन मंदिरामुळे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत परिचित आहे. गावातील ज्येष्ठांच्या सांगण्यानुसार पूर्वी या गावामध्ये मोठमोठाले वडाची झाडे होती. कालांतराने ही झाडे कमी होत गेली. कयाधु नदीच्या काठावर हे गाव आहे. पाण्याचे स्त्रोत भरपूर असल्याने ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अगोदरच हिरवाईने नटलेले हे गाव. परंतु, गावाला पूर्वीचे वैभव मिळावे या हेतूने तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गावातील तरुणाई सरसावली आहे. ‘एक झाड, एक व्यक्ती, एक ट्री गार्ड’ ही संकल्पना केली. ती ग्रामस्थांसमोर ठेवून त्याची अमलबजावणी करून जागृती कालिंका देवीच्या मंदिर परिसरामध्ये या उपक्रमाला सुरुवातही केली.

झाडांचा वाढदिवसही साजरा करणार
झाडे लावून थांबायचेच नाहीतर, ज्या व्यक्तीने झाड लावले, त्याचे संगोपनही त्याच व्यक्तीने करावयाचे आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी या झाडांचा वाढदिवसही साजरा करण्याचे नियोजन युवकांसह ग्रामस्थांनी केलेले आहे. प्रामुख्याने शंकरराव तातेराव चव्हाण, अरुण पाटील चव्हाण, भास्कर चव्हाण आदींसह त्यांच्या टीमने युवकांना प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमांतर्गत ट्रि-गार्डसह इतर साहित्यांसाठी मोठ्याप्रमाणावर मदत सुरू झाली आहे. विशेष हे की, या सामाजिक उपक्रमाला बाहेरूनही मदत होत असल्याने निश्‍चितच हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्‍वास गावातील युवकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.


 ग्रामस्थांचा प्रतिसाद
‘एक झाड, एक व्यक्ती’ या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यावर थांबायचे नाही तर त्या सर्वच वृक्षांचे संगोपन करुन पुढील वर्षी मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करण्याचे आम्ही ठरविले आहे. आमच्या उपक्रमाला गावातील ज्येष्ठांनी चांगला प्रतिसाद देत आर्थिक साह्य केले आहे.
- संतोष संभाजी चव्हाण
  
‘एक झाड, एक व्यक्ती’ ही संकल्पनी मी नांदेडमधील मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच आर्थिक मदत देवून आम्हाला प्रोत्साहन दिले. यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, दिगांबर क्षिरसागर, विवेक देशमुख, राम तरटे, सचिन दिग्रसकर आदींचा समावेश आहे.
- विजय चव्हाण
 
चांगल्या घटनेला जास्त सांगायची गरज लागत नाही. ‘एक झाड, एक व्यक्ती’ या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतु क होत आहे. त्यामुळे चांगल्या व निःस्वार्थ या कार्याला पाठबळ मिळत आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. त्यामुळे या उर्जावरच आम्ही वृक्ष लावगड करणार नाही तर जगवूनही दाखवणार आहे.
- अरुण श्रीराम चव्हाण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com