उदगीरमध्ये महावितरण विरोधात वंचित आघाडीचे अर्धनग्न आंदोलन, वीजबिल माफीची मागणी

सचिन शिवशेट्टे
Thursday, 10 December 2020

लॉकडाउन काळातील  वीजबिल माफ करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी उदगीर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर गुरुवारी (ता.१०) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

उदगीर (जि.लातूर) : लॉकडाउन काळातील  वीजबिल माफ करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी उदगीर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर गुरुवारी (ता.१०) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे काम धंदे बंद होते. हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. त्यात काळातील महाविरतरणने मोठ्या प्रमाणात वाढीव बिले देण्यात आले.

या संदर्भात राज्य सरकार उदासीन असून अधिकचे वीजबिल देऊन जनतेची लूट केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.अतुल धावारे  यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यात सचिन जाधव, संजय भालेराव, प्रा.माधव कांबळे, प्रदीप तोंडचिरकर, सत्यम कंजे, अंबादास सूर्यवंशी, बुधभूषण कंजे, जीवन किवंडे, शुभम कंजे, सचिन कांबळे, विशाल नावसरे, नरशिंग सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Aghadi Agitation Against Mahavitran Udgir News