वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतीला इच्‍छुकांचे शक्तीप्रदर्शन 

महेश गायकवाड
रविवार, 28 जुलै 2019

जिल्हयातील पाचही विधानसभा मतदारासंघातील इच्‍छुकांची मोठी गर्दी जमलेली पहायला मिळाली. याप्रसंगी काही उत्साही इच्‍छुकांनी ढोल ताशांच्या गजरात  शक्तीप्रदर्शन करत मुलाखतीला हजेरी लावली.

जालना : वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्यास असलेल्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीस रविवारी (ता. 28) शहराताील गॅलेक्सी हॉटेल मध्ये दुपारी बारा वाजता सुरूवात झाली.

जिल्हयातील पाचही विधानसभा मतदारासंघातील इच्‍छुकांची मोठी गर्दी जमलेली पहायला मिळाली. याप्रसंगी काही उत्साही इच्‍छुकांनी ढोल ताशांच्या गजरात  शक्तीप्रदर्शन करत मुलाखतीला हजेरी लावली.

जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, जालना व परतूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी इच्‍छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी वंचित बहुजना आघाडीची पाच सदस्यीय राज्यस्‍तरीय समिती रविवारी सकाळी शहरात दाखल झाली. प्रदेशाध्यक्ष  अशोक सोणवने, आण्णाराव पाटील, किसन चव्हाण, रेखाताई ठाकूर यांचा समितीत समावेश आहे.  दुपारी बारा वाजता इच्‍छुकांच्या मुलाखतीला सुरूवात झाली. तत्पूर्वी जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील इच्‍छुकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. यामध्ये मराठव्‍ााडा मुक्ती मोर्चाचे संस्‍थापक अध्यक्ष प्रा.बाबा उगले, काँग्रेसचे ॲड. देवराज डोंगरे, अश्‍विनी गायकवाड यांचाही समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanchit bahujan aghadi interview for assembly election