मुख्यमंत्री म्हणतात, 'वंचित'च राहील विरोधी पक्ष!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नांदेड : 'वंचित बहुजन आघाडी' ही भाजपची 'बी' टीम नाही, तर आगामी काळात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस ही 'बी' टीम होईल आणि त्यांची जागा 'वंचित' घेईल. 'वंचित' 'ए' टीम होईल आणि भविष्यात ती विरोधी पक्ष असेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मराठवाड्यात उसावर अचानक बंदी आणता येणार नाही, त्यातून मार्ग काढावा लागेल, असेही त्यांनी सुचवले. 

महाजनादेश यात्रेनिमित्त येथे आलेल्या फडणवीस यांनी शनिवारी (ता.31) पत्रकार परिषदेत 'वंचित' ही भाजपची 'बी टीम' असल्याच्या विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिले. 

महाजनादेश यात्रेने आतापर्यंत दोन हजार 268 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला असून, ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगून ते म्हणाले, "गेल्या पंधरा वर्षांत सत्तेत असताना कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस काही करू शकले नाहीत. गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षाची भूमिकाही योग्य प्रकारे पार पाडू शकले नाहीत, त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास राहिला नाही. आगामी काळात राज्यात विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उदयास येईल.'' मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आदी यावेळी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले... 
- केंद्राच्या मंजूर घरांमध्ये महराष्ट्रातील सव्वा लाख घरे 
- 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळतील 
- दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी 'वॉटर ग्रीड' 
- कोकणातील 167 टीएमसी पाणी लिफ्ट करून मराठवाड्यात आणणार 

शरद पवार मोठे नेते 
शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्याबद्दल काय बोलणार, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, "काळाची पावले ओळखली पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष आहे. आता तर हा पक्ष पश्‍चिम महाराष्ट्र आणि काही जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे. 

नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत. फक्त त्यांचा पक्ष विलीन करायचा की नाही, याबाबत मित्रपक्ष शिवसेनेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi will remain opposition party says CM Fadnavis