वर्धन घोडे खूनप्रकरणी दोघांना आजीवन कारावास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

औरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.  

वर्धनचे टिळकनगरातील गुरुकुंज हाउसिंग सोसायटीतून २७ फेब्रुवारी २०१७ रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर त्याला दौलताबाद घाटात नेऊन त्याचा गळा आवळत खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अभिलाष मोहनपूरकर आणि श्‍याम मगरे या दोघांना चोवीस तासांत अटक केली होती. पोलिसांनी तातडीने ६२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात ४१ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यामध्ये लहान मुलांनी न्यायालयात न घाबरता साक्षी नोंदविल्या. अभियोग पक्षातर्फे नाशिक येथील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद पूर्ण केला.

Web Title: Vardhan Ghode Murder Case Criminal Punishment Crime