विविध मागण्यांसाठी आडस येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

रामदास साबळे 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

केज : तालुक्यातील होळ मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या मागणीसाठी आडससह परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.१०) सकाळी आडस येथील शिवाजी महाराज चौकात करपलेली पिके व बैलगाड्यासह एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

तालुक्यातील होळ महसूल मंडळात पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. थोड्याफार पडलेल्या पावसावर कशाबश्या खरीपाच्या पेरण्या करण्यात आल्या. मात्र, पेरणीनंतर एक महिना संपला तरी पाऊस न पडल्याने या भागात कोवळी पिक करपली आहेत; तर कांही पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी आडस येथील शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन केले आहे.

या आंदोलनात रमेश आडसकर, राम माने, सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच ओमकार आकुसकर, शिवरूद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख, राजेभाऊ पत्रवाळे, विकास काशिद, रमेश ढोले,  गफार पठाण, शिवाजी खडके, शाम गंगात्रे यांच्यासह परीसरात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नायब तहसीलदार एन.एम. शेख यांना देऊन रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: For Various Demands Farmers Started Rasta Roko in Aadas