Ganpati Visarjan : वसमत शहर व परिसरात गणरायाला उत्साहात निरोप

वसमत शहर व ग्रामीण भागात सकाळी ११ वाजल्यापासून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
Vasmat ganpati Visarjan
Vasmat ganpati VisarjanSakal

वसमत - वसमत शहर व ग्रामीण भागात सकाळी ११ वाजल्यापासून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तर मोठ्या व परवानाधारक गणेश मंडळांनी दुपारी १२ नंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. शहरात ट्रँक्टर, छोटा हत्ती आदी वाहनांवर गणेशाची ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढली. तसेच परंपरागत बैलांना सजवून बैलगाडीत मिरवणूक काढल्याचे निदर्शनास आले.

बाल गणेश मंडळांनी सकाळी ११ पासून गणपती विसर्जनास सुरुवात केली. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पाठिमागे असलेल्या व नगर परिषदेने ठरवून दिलेल्या विहरीत छोट्या गणेश मंडळांनी बाप्पाचे विसर्जन केले. तसेच अनेक घरगुती व गणेश मंडळांनी उघडी नदीमध्ये गणपतीचे विसर्जन केले.

शहरात मानाच्या १३ गणपतींसह १०९ गणेश मंडळ परवानाधारक होते. तर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावात १०० गणेश मंडळ परवानाधारक होते. तर २५ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना केली होती. शहरात मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था व व्यापारी, नागरिकांनी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, फराळाची व्यवस्था केली होती.

सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी चोख बंदोबस्तात शांततेत गणेश विसर्जन पार पाडले. तर शहरात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.‌ सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसांच्या गणपतीचे विसर्जन शांततेत व उत्साहात संपन्न झाले. सायंकाळी ७ वाजता रात्रीच्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com