परभणीत 'नवोदय'च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

वसमत - येथील जवाहर नवोदय विद्यालयातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या व इतर प्रश्‍नांची सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी चौकशी केली आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार असल्याचे आश्‍वासन नवोदय प्रशासनाचे अमरावती येथील सहायक आयुक्त पी. एस. सरदार यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी अन्य काही समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी नवोदय विद्यालयातील पाचशे विद्यार्थ्यांनी सोमवारी दिवसभर वसतिगृहात कोंडून घेतले. त्यामुळे सरदार यांनी येथे धाव घेतली व काल रात्री विद्यार्थ्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आज सकाळीही बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
Web Title: vasmat news navoday school student agitation