वाहनांची फिटनेस तपासणी झाली धोकादायक

अनिल जमधडे
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - आरटीओतर्फे वाहनांची फिटनेस तपासणी करताना अपघाताचे प्रमाण वाढले आहे; मात्र तरीही परिवहन विभागाने साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे निरीक्षकांना फिटनेस चाचणीची ड्युटीच नकोशी वाटू लागली आहे.  

आरटीओच्या करोडी येथील फिटनेस ट्रॅकवर गेल्या आठवड्यात फिटनेस तपासणी करताना, कॅन्टरची केबिन तुटून खाली कोसळली. यामध्ये मोटार वाहन निरीक्षक नीलेश लोखंडे गंभीर जखमी झाले. या घटनेने फिटनेस चाचणी करताना, वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची फिटनेस (योग्यता) तपासणी प्रत्येक वर्षी करणे बंधनकारक आहे. 

यासाठी करोडी येथे फिटनेस तपासणी ट्रॅक तयार केलेला आहे. वाहनांच्या फिटनेस तपासणीत प्रवासी किंवा वाहनातील माल सुरक्षित राहील का, यादृष्टीने चाचण्या घेतल्या जातात.  

पूर्वीच्या काही घटना 
वाहनांची फिटनेस तपासणी करताना सहा महिन्यांपूर्वी बारामती आरटीओ कार्यालयात वाहनाचा अपघात झाला होता. पुणे आरटीओ कार्यालयातही असाच अपघात झाला होता. गेल्याच आठवड्यात जालना कार्यालयात फिटनेस तपासणी करताना ब्रेक लावताच, रिक्षा खड्ड्यात गेला. 

ही आहे समस्या 
वाहनांची फिटनेस तपासणी करताना मोटार वाहन निरीक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वाहनांची अवस्था वाईट असते. चालक वाहनांचे ब्रेक, बसण्याचे आसन, साईड ग्लास यासह अन्य काही बाबी आपल्या पद्धतीने सेट करून ठेवतो. विशेषतः ब्रेकचा अंदाज येत नाही. त्यामुळे नेहमीच वाहनाचा अपघात होण्याचा धोका कायमच असतो.

काय आहे तपासणी? 
 वाहनाच्या ब्रेकची चाचणी 
 वायफर तपासणी,
 इंडिकेटर, टेल-ब्रेक लॅम्प व अन्य लाइट तपासणी
 चेसीस व इंजिन क्रमांकाची खात्री करणे 
 स्पीड गव्हर्नर सुस्थितीत आहे काय
 हॉर्न सुयोग्य पद्धतीचा असावा
 हेड लॅम्पची डीम ॲनालायझरने तपासणी
 टायरची टायरगेजच्या साहाय्याने स्थिती तपासणी 

Web Title: Vehicle Fitness Cheaking Danger