बस आगाराच्या ताब्यात दिलेले वाहन सुरक्षारक्षकासमोर नेले पळवून

गुन्हा
गुन्हा

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : आरटीओने गेल्या महिन्यात सिल्लोडला कारवाई
करून येथील एसटी आगारप्रमुखांच्या ताब्यात दिलेले टेंपो ट्रॅव्हलर वाहन एकाने सुरक्षारक्षकासमोर भरधाव वेगाने चालवत पळवून नेले. ही घटना सोमवारी (ता. 14) रात्री नऊच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथिल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) श्री. काळे यांनी 23 सप्टेंबर 2019 रोजी केलेल्या कारवाईत टेंपो ट्रॅव्हलर (एमएच-05, एझेड- 947) वाहन जप्त केले. त्यानंतर हे वाहन सिल्लोड एसटी आगाराचे आगारप्रमुख प्रवीण भोंडवे यांच्या ताब्यात दिले. हे वाहन बस आगाराच्या परिसरात ठेवण्यात आले. सोमवारी (ता. 14) रात्री नऊच्या सुमारास सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना एका व्यक्तीने बस आगारात घुसून सुरक्षारक्षकासमोर भरधाव वेगान टेंपो ट्रॅव्हलर वाहन नेले.

सिल्लोड आगारात घडलेल्या या प्रकारामुळे आगारातील सुरक्षा किती वाऱ्यावर आहे, याचा प्रत्यय आला. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने कारवाईत पकडलेले वाहन एसटी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चोरी गेले आहे. आता याची जबाबदारी कोणाची? याची चर्चा शहरात सुरू होती. याप्रकरणी आगारप्रमुख प्रवीण भोंडवे यांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com