उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात 'येळवस' उत्साहात साजरी

वेळ अमावास्यानिमित्त (येळवस) उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेत-शिवारात नागरिकांची मोठी गर्दी होती.
Vela Amavasya
Vela Amavasyaesakal

उमरगा (जि.उस्मानाबाद) : वेळ अमावास्यानिमित्त (येळवस) रविवारी (ता.दोन) उस्मानाबाद, लातूर सोलापूर, बीड जिल्ह्यातील शेत शिवारात नागरिकांची मोठी गर्दी होती. शेतकरी कुटुंबिय मोठ्या उत्साहात शेतातील पाच पांडवाची विधिवत पुजा करून अन्नधान्य बरकतीची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. नैसर्गिक संकट कितीही आले तरी काळ्या आईची (लक्ष्मीची) पुजा करण्याच्या परंपरेत शेतकऱ्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. नवीन वर्षातला पहिल्या रविवारचा योग वेळ अमावस्येला आल्याने शेतकरी कुटुंबियात मोठा उत्साह दिसतोय. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. हजारो कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेती कसणारा वर्गही मोठा आहे. शेतीला 'धनलक्ष्मी' मानणारा शेतकरी बांधव शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत  काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून  वेळ अमावस्या साजरा करतो. बहुतांश नागरिकांचा रविवारचा दिवस शेत शिवारात गेला. (Vela Amavasya Celebrate In Osmanabad, Latur And Beed)

Vela Amavasya
उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा, अजित पवारांचा राणेंना सल्ला

विधिवत पुजा अन् उत्साह

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा, बिदर जिल्ह्यात ही प्रथा सुरू झाली तेथे येळ अमावस्या असे म्हटले जाते. त्यामुळे वेळ अमावस्येला येळवस हाही शब्दप्रयोग आपल्याकडे आला. सणाच्या आदल्या दिवशी शेतातील झाडाच्या बुंद्याला कडब्याची इरली कोप तयार आली होती. कोपीत पाच पांडव्याला गेरू, चुन्याची रंगोटी केली गेली. रविवार पहाटे अंबिलाचं बिदंग डोक्यावर घेऊन शेतीकडे जात होते. कारभारी - कारभारीनं जोडीनं दिवे पाजळत विधिवत पद्धतीने पाच पांडवाची पुजा केली. त्यानंतर " हरभल्या भगतरा जो हरभल्या ... चा जयघोष करत ज्वारी, हरभऱ्याच्या पिकात अंबिल शिंपडले गेले.

Vela Amavasya
डिसेंबरच्या परीक्षांची जाहिराती जानेवारीत, MPSCने दिली महत्त्वाची माहिती

वन भोजनाचा घेतला आस्वाद

शिवारात ओलीता खालील पिके बहरात आलेे असले तरी पिकांवरील कीड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट करावा लागतोय. नैसर्गिक संकटाचे कितीही धुके आले तरी शेतकरी कुटुंबासाठी वेळ अमावस्याचा सण एक पर्वणीच असते. बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजुनही बरेच शेतकरी कुटुंबिय बैलगाडीतुन शेताकडे जात होते. तर बहुतांश जण दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे जात होते. सजगुऱ्याचे (बाजरी) उंडे, कानवले, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी, पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासुन तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) आदी खाद्य पदार्थाची मेजवाणी घेत शेतकरी बांधव कुटुंबासह, मित्रमंडळीनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com