उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा, अजित पवारांचा राणेंना सल्ला | Ajit Pawar Comment Narayan Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar
उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा, अजित पवारांचा राणेंना सल्ला

उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा, अजित पवारांचा राणेंना सल्ला

पुणे : सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीला यश मिळाले नाही, ज्यांना यश मिळाले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ही बँक चांगली चालवावी अशा शुभेच्छा देतो, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज रविवारी (ता.दोन) पराभव स्वीकारत विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अर्थमंत्री येऊनही बँकेच्या निवडणुकीत फरक पडला नाही. या नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार यांनी नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. (Bring Fund For State From Union Government, Ajit Pawar Advised To Narayan Rane In Pune)

हेही वाचा: डिसेंबरच्या परीक्षांची जाहिराती जानेवारीत, MPSCने दिली महत्त्वाची माहिती

एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणावा. आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करु असे ते म्हणाले.आज पुणे जिल्हा बँकेसाठी (Pune) मतदान होत आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवत आहे. त्याचा निकाळ काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ajit Pawar
loading image
go to top