#MarathaKrantiMorcha सेलूत आरक्षणासाठी तरुणाचा बळी 

 विलास शिंदे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

सेलू : शासनस्तरावरुन मराठा आरक्षणाला विलंब होत असल्याने मराठा समाजातील तरुणांमध्ये नैराश्य वातावरण पसरत अाहे. यात डिग्रसवाडी (ता.सेलू ) येथे समाजास आरक्षण मिळावे, यासाठी उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ला पेटवून घेऊन रविवारी ता.५) रोजी सकाळी दहाच्या सुमारास आपली जीवनयात्रा संपविली आहे. 

सेलू : शासनस्तरावरुन मराठा आरक्षणाला विलंब होत असल्याने मराठा समाजातील तरुणांमध्ये नैराश्य वातावरण पसरत अाहे. यात डिग्रसवाडी (ता.सेलू ) येथे समाजास आरक्षण मिळावे, यासाठी उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ला पेटवून घेऊन रविवारी ता.५) रोजी सकाळी दहाच्या सुमारास आपली जीवनयात्रा संपविली आहे. 

डिग्रस वाडी ( ता.सेलू ) येथील उच्चशिक्षित तरुण अनंत सुंदरराव लेवडे (वय २४ ) याने मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना स्वत:च्या फेसबुक खात्यावरुन पोस्ट करुन समाजास आरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली व मी जातीसाठी बलिदान देत आहे, अशी टिप्पणी टाकून त्याने गावाजवळील उजव्या कालव्याच्या बाजूच्या शेतात स्वत:च्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली.

सदरील घटनेत मयत अनंत लेवडे याचा जागीच मृत्यु झाला. मयत अनंत लेवडे याने इंजिनिअरींगमध्ये पदविका घेतली होती. त्याने बजाज कंपनीमध्ये नोकरी केली होती. परंतु चार वर्ष कंपनीत काम केल्यानंतरही कायम करण्यात आले नाही व कामावरुन कमी करण्यात आले. त्यानंतर मयत अनंत लेवडे यांनी दिल्ली येथे जाऊन नोकरी केली. मात्र, हाती काहीच लागत नव्हते. त्यातच घरची परिस्थिती नाजूक घरात एक गुंठाही जमिन नाही.

मराठा समाजाची परिस्थिती जेमतेम असून आरक्षण नसल्याच्या कारणाने नोकरी लागत नाही याची खंत मनात सलत होती. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनात अनंत याचा सक्रिय सहभाग होता.

मयत अनंत लेवडे यांनी मुख्यमंत्री यांना फेसबुक खात्यावर मराठा समाजास आरक्षण मिळावे याची टिप्पणी केली आहे. देशासाठी काही करता आले नाही. परंतु जातीसाठी बलिदान देत असल्याची टिप्पणी टाकून आपली जीवनयात्रा संपविली. मयत अनंत लेवडे यांच्या पाश्चात आई, वडिल व दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The victim of youth for Maratha reservation