Vidarbha : सोयाबीन-कापूस उत्पादकांची ताकद सरकारला दाखवून देणार : तुपकर

या महामोर्चातून सोयाबीन-कापूस उत्पादकांची ताकद सरकारला दाखवून देऊ
Ravikant Tupkar
Ravikant Tupkaresakal

बुलडाणा : शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय हक्कांसाठी रविकांत तुपकर यांनी एल्गार रथयात्रेच्या माध्यमातून आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. ५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या एल्गार रथयात्रेचे २० नोव्हेंबरला एल्गार महामोर्चात रूपांतर होणार आहे.

या महामोर्चातून सोयाबीन-कापूस उत्पादकांची ताकद सरकारला दाखवून देऊ, अशा इशारा १७ नोव्हेंबर रोजी मोताळ्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांनी दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत.

Ravikant Tupkar
Health Care News: थंडीच्या दिवसात सुपरफूड आहे खजूर; हिमोग्लोबिन वाढेल आणि पचनही सुधारेल

५ नोव्हेंबरपासून संतनगरी शेगावातून सुरू झालेली एल्गार रथयात्रा १६ नोव्हेंबरला मोताळा तालुक्यात दाखल झाली. तालुक्यातील हनवतखेड, गोतमारा, कोऱ्हाळा बाजार, खेडी, पान्हेरा, सारोळा मारोती, पोफळी, चावर्दा, पिंप्री गवळी, माकोडी - टेंभी, जहांगीरपूर, शेलगाव बाजार, सावरगाव, आव्हा, लिहा, पिंपळगाव देवी, धामणगाव बढे, सिंदखेड लपाली तर १७ नोव्हेंबरला किन्होळा, तपोवन, थळ, रोहिणखेड, उबाळखेड, नळकुंड, तांडा, दाभा, राहेरी, खामखेड, खडकी, मोहेगाव, राजूर, वाघजाळ, मोताळा (शहर), डीडोळा बु., घुस्सर बु., घुस्सर खुर्द, दाभाडी, तळणी, शेलापूर बु. शेलापूर खुर्द या गावांत एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com