Video : लॉकडाऊनच्या काळात पोटाची काळजी आवश्यक : डाॅ. नितीन जोशी

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : भारत हा संस्कृती आणि कृषीप्रधान देश आहे. वर्षभरात जवळपास दोन ते अडीच महिने सर्व धर्मियांमध्ये उत्सव, सण व त्यानुषंगाने होणारे समारंभ साजरे केले जातात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी सण, उत्सवांवर मर्यादा आलेल्या आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी नागरिक घरातच बसून आहेत. त्यामुळे पोटाची काळजी घेणे आवश्यक आहे, असे पचनसंस्थाविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी सांगितले.

अशी घ्यावी काळजी

  • हिंडणे, फिरणे तसेच नातेवाइकांना भेटणे टाळावे
  • जास्त गोड-धोड पदार्थ खाऊ नये
  • स्नान दिवसातून दोन वेळा केल्यास अती उत्तम.
  • दिवसातून किमान चार ते पाच वेळा साबणाने किंवा सॅनिटायझरने हात धुवावेत
  • फळ-भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावात.


तणावमुक्त जिवनासाठी हे करावे

  1. सकाळी उठल्यावर साबणाने किमान १५ ते २० मिनिटे स्नान करावे. त्यानंतर योग, प्राणायाम आणि व्यायाम अवश्य करावा.
  2. घरातील सर्व व्यक्तींनी तीन हातांचे अंतर ठेवून एकत्र यावे.
  3. नाष्ट्याला मोड आलेल्या कडधान्याची उसळ, दही, ताक आणि शक्य असल्यास कोणतीही ताजी फळे खावीत.
  4. मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतलेल्या काकडी, टोमॅटो, गाजर इत्यादी सॅलड्सने करावा.
  5. नाश्ता झाल्यावर, आपल्या आवडीचे घरकाम, बागकाम किंवा कपडे धुणे अशी कामे करावीत.
  6. आवडीचे पुस्तक किंवा वृत्तपत्रातील लेख जरूर वाचावेत तसेच सर्जनशील काम करावे.
  7. दुपारच्या जेवणात शक्यतो एक चपाती किंवा एक भाकरी, वाटीभर दाळ किंवा भाजी आणि अर्धी वाटी भात खावा.
  8. जेवणाआधी पोट भरेल इतके टरबूज, खरबूज, काकडी, गाजर, खावीत.
  9. जेवणानंतर ग्लासभर ताक जरूर प्यावे.
  10. दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी प्यावे.
  11. संध्याकाळच्यावेळी घरासमोर किंवा छतावर तोंडाला रुमाल बांधून फेऱ्या माराव्यात
  12. झोपण्यापूर्वी पुस्तकाचे चार पाने कमीत कमी वाचावीत किंवा आपल्या आवडीचे संगीत ऐकावे.

हे कायम लक्षात ठेवावे

लक्षात ठेवा संयम, सहनशीलता, धैर्य या तीन गुणांनी फक्त पोटच नाही तर संपूर्ण मानवजातीचे योग्य रक्षण करण्यासाठी आपली नेमणूक परमेश्वराने केली आहे. म्हणजेच आपल्या शेजारचे ‘देव’ आपणच आहोत हे कायम लक्षात ठेवावे.
- डॉ. नितीन जोशी, पचनसंस्थाविकार तज्ज्ञ, नांदेड

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com