Video : खासदार हेमंत पाटील यांच्याकडून आदेशाचे पालन; काय आहे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आमदार आणि खासदार यांना एक महिण्याचे वेतन देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत  हिंगोली जिल्ह्याचे खासादर हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.२८ मार्च २०२०) रोजी एक महिण्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्धार केला आहे.

नांदेड : जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरस हळुहळु भारतात पाय पसरत आहे. रोज नवीन कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देश सध्या लॉकडाऊन करण्यात आला आहे. भविष्यात या आजारात वाढ होणार नाही, यासाठी खबरदारीचे सर्व त्या उपायोजना करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक दानशूरांनी मुख्यमंत्री सहाय्यती निधीसाठी आपापल्या परीने मदत दिलेली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आमदार आणि खासदार यांना एक महिण्याचे वेतन देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत  हिंगोली जिल्ह्याचे खासादर हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.२८ मार्च २०२०) रोजी एक महिण्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी ‘सकाळ’शी बोलताना खासदार श्री पाटील म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे देशापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमुळे देशातल्या अनेक समाज घटकावरच नव्हे तर, लहान मोठ्या उद्योग, व्यवसाय आणि शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. 

हेही वाचा - कोरोना : नांदेड कारागृहातील पंधरा कैद्यांना जामिन

परंतु सद्यस्थितीत कोरोना व्हायरसला रोखणे ही प्राथमिकता असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्क, सॅनिटायझर, व्हॅक्सिन, फ्लु संबंधी औषध- गोळ्या, व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून, त्यासाठी मी माझे एक महिण्याचे वेतन राज्य शासनच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत असल्याचे ते म्हणाले. कोरोना व्हायरस कितीही खतरनाक असला तरी, तो बरा होतो. परंतु यासाठी नागरीकांनी घाबरुन न जाता घरात बसण्याचे आवाहन देखील खासदार पाटील यांनी केले आहे. 
 
खासदार हेमंत पाटील हे नेहमीच समाजपयोगी कार्यासाठी योगदान देत आले आहेत. यापूर्वी देखील आमदार असताना श्री. पाटील यांनी ‘मी अनवाणी’ हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी शुज वाटप करण्यासाठीचा अनोखा उपक्रम राबवून राज्याचे लक्ष वेधुन घेतले होते.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: MP Hemant Patil's Order To Be Obeyed; What Is The Command  Nanded News