Video : नांदेड महापालिकेतर्फे औषधाची फवारणी सुरु

अभय कुळकजाईकर
शुक्रवार, 27 मार्च 2020

नांदेड कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. 

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार दिवसापासून शहरातील विविध भागात तसेच मुख्य रस्त्यावर औषधाची फवारणी सुरु करण्यात आली आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात  लॉकडाऊन लागू झाले आहे. जिल्हा पातळीवरही प्रशासन या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाय योजना करीत आहेत. याचा एक भाग म्हणून नांदड महापालिकेच्या वतीने मागील चार दिवसांपासून शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरण केले जात आहे. 

हे ही वाचा - माहूरच्या खासगी डॉक्टरांच्या कार्याला ‘सलाम’

संसर्ग रोखण्यासाठी फवारणी
महापालिकेकडून डास, कीटक, जिवाणू करण्यासाठी औषधाची फवारणी केली जात आहे. सोडीयम हायड्रोक्लोराइडची फवारणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका स्थरावर इतर विविध उपाययोजना  करण्यात आल्या आहेत. शहरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांना तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून विक्री करण्याच्या सूचना ही महापालिकेने दिल्या आहेत. 

आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडून दक्षता
जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. विपीन यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. दररोज स्वच्छता व साफसफाई करुन स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात सोडीयम हायफ्रोराईडची फवारणी करण्यात येत आहेत. यावेळी उपायुक्त अजितपालसिंघ संधू, उपायुक्त विलास भोसीकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, अग्निशमन अधिकारी रईस पाशा, सहायक आयुक्त डॉ. मिर्झा बेग आदींची यावेळी उपस्थिती होती. वजिराबाद भागात तसेच गुरुद्वारा परिसरात निर्रजंतुकीकरण करण्यासाठी औषधाची फवारणी करण्यात आली.

हे ही वाचलेच पाहिजे - जिल्ह्यात २२ हजार नागरिकांची घरवापसी- कुठे ते वाचा

भाजी, फळ विक्रेत्यांचे निवेदन
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाजी मार्केट आणि फळ मार्केटच्या विक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे, अशी मागणी भाजी मार्केटचे अध्यक्ष मोहमंद जावीद, फ्रुट मार्केटचे अध्यक्ष अब्दुल मुजीब, नगरसेवक अब्दुल हबीब बागवान, नगरसेवक अब्दुल हफीज आदींनी केली आहे. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. विपीन यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे.
  
रस्त्यावर औषध फवारणी
शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य मार्गावर व तसेच अंतर्गत भागातील रस्त्यावर औषध फवारणी केली जात आहे. सोडियम हाइड्रोक्लोराइडची फवारणी करण्यात येत आहे.
- अजितपालसिंघ संधू, उपायुक्त, नांदेड महापालिका.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video : Nanded Municipal Corporation starts spraying medicine