file photo
file photo

Video- परभणीत मंडप डेकोरेशन व्यवसायीकांची जोरदार निदर्शने

परभणी ः इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांचे सण, उत्सव साजरे करणाऱ्या मंडप डेकोरेशन त्याशी निगडीत व्यवसायांवर सध्या नैराश्य आले आहे. कारण आहे कोरोनाचे. कोरोना काळापासून हे व्यवसाय बंद आहेत. त्यांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे या व्यवसायीकामध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. आम्हाला ही व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत या व्यवसायीकांनी सोमवारी (ता. दोन) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

कोरोना विषाणु संसर्गामुळे देश व देशातंरर्गत व्यवसायीकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे टेन्ट, मंडप, कॅटरींग, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, डी.जे. साऊंड, लाईट डेकोरेशन, इव्हेंट अडचणीत आले आहेत. त्यामुळे मानसिक तनावाखाली येवून या व्यवसायीकांनाध्ये नैराश्य पसरले आहे. त्यामुळे तातडीने हे व्यवसाय सुरु करण्यात यावेत अशी मागणी या व्यवसायांनी गेल्या कित्तेक दिवसापासून केली आहे. अखेर सोमवार, ता. 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

500 व्यक्तीच्या उपस्थित कार्यक्रमांनी परवानगी देण्यात यावी

सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा अध्या लोकांच्या आसण क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी 500 व्यक्तीच्या उपस्थित कार्यक्रमांनी परवानगी देण्यात यावी.टेन्ट मंडप, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, लॉन्स, कॅटरींग इव्हेंट मॅनेजमेंट साऊंड, लाईट डेकोरेशन आणि इतर या व्यवसायाशी संबंधीत जीएसटी 18 टक्के च्या ऐवजी 5 टक्के पर्यंत करावी, बऱ्याचशा व्यवसाय धारकांनी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम, बॅक्वेट हॉल, मंगल कार्यालय, किरायाने घेतले आहेत.

विवाह समारंभावर लागणारा जीएसटी वधु पित्याला परत मिळण्याची तरतुद करावी

तेव्हा परिस्थित सामान्य होई पर्यंत याचे भाडे घेवू नये असे निर्देश व कायद्यात समाविष्ट करावे, कर्मचारी यांच्य पीएफ भरण्यामध्ये सवलत द्यावी, टेन्ट, मंडपामध्ये होणाऱ्या विवाह समारंभावर लागणारा जीएसटी वधु पित्याला परत मिळण्याची तरतुद करावी, कर्ज धारकांचे व्याज माफ करावे, इएमआई स्थिती सामान्य होई पर्यंत चालु करण्यात येऊ नये, सर्व टेन्ट मंडप व्यवसायधारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा ज्यामुळे त्यांचा रोजगार व व्यवसाय चालविण्यासाठी बॅंकेकडून कर्ज प्राप्त होऊ शकेल आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टेन्ट मंडप, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, लॉन्स, कॅटरींग, इव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड व  लाईट डेकोरेशन व्यवसायीकांची अत्यंत दयनीय आवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेवून आम्हाला व्यवसायाची परवानगी द्यावी अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग स्विकारावा लागेल.

- मिन्हाज फारुखी, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र टेन्ट डिलर्स असोसिएशन, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com