धस आमच्यासोबत, हा कुणाला धक्का - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस आता आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने त्यांना रिंगणात उतरविले आहे. आता हा कुणाला धक्का आहे, याचा विचार संबंधितांनी करावा, असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला.

उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस आता आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने त्यांना रिंगणात उतरविले आहे. आता हा कुणाला धक्का आहे, याचा विचार संबंधितांनी करावा, असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला.

भाजपचे रमेश कराड यांना प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना या मतदारसंघाची उमेदवारीही दिली. त्यांनी काल अर्ज भरला. त्यानंतर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी, हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले होते. श्री. धस यांनी भाजपकडून गुरुवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज भरल्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत नाव न घेता धनंजय मुंडे यांना सवाल केला.

पत्रकारांच्या प्रश्‍नांवर त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली, हा माझ्यासाठी धक्काच नाही. कराड हे पक्ष सोडून गेले आहेत. माझ्यासाठी धक्का असल्याचे सांगणाऱ्यांनी आपण काय गमावले, याचा विचार करावा. चारवेळा आमदार आणि मंत्रिपदाचा अनुभव असलेले सुरेश धस हे आमच्याबरोबर आहेत, हा धक्का कोणाला आहे, याचा विचार त्यांनी करावा. दोन महिन्यांपासून एकाला उमेदवारी देतो म्हणून मतदारसंघात फिरायला लावले. ऐनवेळी कराड यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली, ही त्यांची अगतिकता असल्याचे स्पष्ट होते. एवढी अगतिकता आमची नाही’.

हा मतदारसंघ तीनवेळा काँग्रेसकडे होता. त्यावेळी आमचे फारसे संख्याबळही नव्हते. सध्या तिन्ही जिल्ह्यांत आमचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने या निवडणुकीत उतरलो आहोत. अत्यंत ताकदीने निवडणूक लढवणार आहोत. संख्याबळ पाहता आम्ही विजयाकडे वाटचाल करीत आहोत. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी आम्हाला चिंतेचे कारण नसल्याचे मुंडे म्हणाल्या.

धस यांचा आरोप
खालचीच काही मंडळी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडपाण्यावर चालवत आहेत. अशा तोडपाणी करणाऱ्या मंडळींमुळे बाबाजानी दुर्राणी, अशोक जगदाळे हे या निवडणुकीत बळी ठरले, असा आरोप सुरेश धस यांनी कोणाचेही नाव न घेता केला.

Web Title: vidhan parisha election suresh dhas pankaj munde politics