esakal | परळीत भावनेच्या राजकारणाला छेद; धनंजय मुंडे विजयी|Vidhan Sabha 2019 Result
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan sabha 2019 maharashtra result beed parali ncp dhananjay munde won

परळीत भावनेच्या राजकारणाला छेद; धनंजय मुंडे विजयी|Vidhan Sabha 2019 Result

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

परळी : राज्याच्या कॅबिनेटमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले होते. दोन बहीण भावांच्या या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच मतदानाच्या दोन दिवस आधी, धनंजय मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरून मोठा राजकीय वाद उफाळून आला होता. त्यामुळे ही निवडणूक आणखीनच लक्षवेधी ठरली होती. त्यात धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे.

दानवेंच्या जावयाचा करिष्मा गुल 

सुरुवातीच्या टप्प्यात धनंज मुंडे यांना  21 हजार 427 मतांची आघाडी मिळाल्याची माहिती होती. इतक्या मोठ्या मतांचा फरक पंकजा मुंडे यांना तोडता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं सकाळच्या पहिल्या टप्प्यातील मोजणीनंतरच धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यामुळे सकाळपासूनच परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु होता. विजय दृष्टीपथात येऊ लागल्यानंतर ग्रामीण भागातील कार्यकर्तेही परळीच्या दिशेने रवाना झाले.

भाजपला जोरदार झटका; काँग्रेस सत्तास्थापनेच्या तयारीत

विकास विरुद्ध भावना
परळीची लढत ही विकासाचे राजकारण विरुद्ध भावनेचे राजकारण, अशी झाली होती. त्यात जनतेने विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी 2014मध्ये निवडणूक लढवली होती. त्यात मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात काम सुरू केले होते. सर्वसामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला होता. एकेकाळी स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे मतदारसंघातील काम पाहणारे धनंजय मुंडे भाजपलासोडून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. त्यांना पक्षाने विधान परिषदेत पाठविले आणि सभागृहात विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारीही दिली होती. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव करून, विधानसभेत प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांचा विजय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.