Vidhan Sabha 2019 : मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Vidhan Sabha 2019 : मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

विधानसभा 2019 
घनसावंगी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार तेल लावून उभेत समोर पैलवानच नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पैलवान आणि कुस्ती यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. 

त्यांनी शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घनसावंगी येथे झालेल्या जाहीर सभेत युती सरकारवर जोरदार टीक केली. पवार म्हणाले, ‘पाच वर्षांत सत्ता असूनही शिवसेना-भाजपने शेतीसह शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले नाही. त्यामुळे पाच वर्षांच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. शेतीमालाला भाव नाही, उसाला कर्ज नाही, विहीर-शेतीवर कर्ज घेतले तर जप्तीची कार्यवाही होते. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की, शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटींचे आर्थिक बजेट दिले आहे. खरेतर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्याची दानत नाही. मी कृषिमंत्री असताना 70 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. या सरकारने कर्जमाफीला ऑनलाइन कचाट्याबरोबर विविध निकषांत टाकले. या सरकारमुळे कंपन्या बंद पडून बेरोजगारी वाढली.’ घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला उमेदवार राजेश टोपे, अरविंद चव्हाण, डॉ. निसार देशमुख, राजाभाऊ देशमुख, कल्याण आखाडे, सतीश टोपे, संजय काळबांडे, बबलू चौधरी, उत्तमराव पवार आदी उपस्थित होते. 

खऱ्या पहिलवानांशी लढतो
मुख्यमंत्र्यांच्या कुस्ती आणि पैलवान या वक्तव्याचा समाचार घेताना, पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीस सांगतात की, आमचा पहिलवान कुस्तीसाठी तयार आहे. विरोधकांचे पहिलवान तयार नाहीत, असे सांगतात हे खरे आहे. कारण मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याने आम्ही खऱ्या पहिलवानांशी लढतो. या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री यांना सभा घ्यावी लागते. या सरकारला खाली उतरवून काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवर बसवायचे जनतेने ठरविलेले आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com