
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अभिनेते रितेश देशमुख सध्या विधानसभेचं स्टेज गाजवत आहेत. मराठवाड्यात त्यांच्या जाहीर सभांना प्रचंड मागणी असून, काँग्रेसचे ते जणू स्टार प्रचारक आहेत. लातूरमध्ये झालेल्या त्यांच्या जाहीर सभांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अभिनेते रितेश देशमुख सध्या विधानसभेचं स्टेज गाजवत आहेत. मराठवाड्यात त्यांच्या जाहीर सभांना प्रचंड मागणी असून, काँग्रेसचे ते जणू स्टार प्रचारक आहेत. लातूरमध्ये झालेल्या त्यांच्या जाहीर सभांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
काय म्हणाला रितेश?
लातूरच्या सभेत त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला असून, 'मेकअप कितीही चांगला केला तरी, तो खरा चेहरा झाकू शकत नाही. भाजप सरकारचा खरा चेहरा जनते समोर आला आहे,' अशा शब्दांत रितेशने भाजपचा समाचार घेतला आहे. लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
निवडणुकीच्या धामधुमीतील रितेश-धीरजचा व्हिडिओ पाहिला का?
संघर्ष लातूरच्या रक्तात
रितेश म्हणाले, ‘मुंबईत मला माझे मित्र विचारतात की, तुझे भाऊ निवडणूक लढवणार आहेत का? मी त्यांना विचारलं, असं का विचारताय? तर, ते म्हणाले, यावेळी थोडं अवघड वाटतंय. पण, मी त्यांना सांगितलं की मी आणि माझं कुटुंब लातूरचं आहे. संघर्ष करणं आमच्या रक्तात आहे. आजची ही सभा पाहिली तर, ती प्रचाराची नाही. तर, विजयाची सभा आहे.’
जेनेलिया वहिनी पोहोचल्या दिरांचे अर्ज भरायला
लातूरच्या तरुणांना संधी
रितेश म्हणाला, 'लातूर शहर व ग्रामीण मतदार संघाला प्रचंड मोठा वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा प्रामाणिकपणे पुढे चालविण्याचे काम अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्याकडून होत आहे त्याला आपली साथ हवी. लातूरकरासाठी कुठलीही गोष्ट अशक्य आहे असे नाही तर लातूरवासियांना अडचणीत देखील आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची व विजय खेचून आणण्याची सवय आहे. विलासराव देशमुख यांच्यासाठी मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. मात्र, अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्या रूपात येणाऱ्या २१ तारखेला महाराष्ट्राचे नेतृत्व विधानसभेत पाठविण्याची संधी मिळाली आहे, असं आज लातूरच्या युवकांना वाटतं . जी कमी गेली दोन टर्म होती ती कमी आता मतदारांनी लातूर शहर व ग्रामीण मतदार संघात लाखोच्या मताधिक्याने दोन्ही उमेदवारांना विजयी करावे.'