Video : निवडणूकीच्या धामधूमीत रितेश-धीरजचा हा हटके व्हिडिओ बघितला का?

टीम ईसकाळ
Saturday, 5 October 2019

निवडणूकीच्या धामधूमीत रितेश आणि त्याचा भाऊ धीरज यांचा एक टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होतोय.

लातूर : विधानसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा काल (ता. 4) शेवटचा दिवस होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन सुपूत्र अमित व धीरज यांनीही काल कुटूंबियांसह लातूरात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासह भाऊ व अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया देशमुखही उपस्थित होते. या सर्व धामधूमीत रितेश आणि त्याचा भाऊ धीरज यांचा एक टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होतोय. 

जेनेलिया वहिनी पोहोचल्या दिरांचे उमेदवारी अर्ज भरायला 

काल रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये हे दोघं भाऊ मजा करत एका गाण्यावर मजा करताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी केलेला हा व्हिडिओ असावा असा अंदाज आहे. यातून कळतं की कितीही गंभीर काम असलं तरी ते आनंदात आणि उत्साहात करायची रितेशची सवय आहे. या व्हिडिओत एका हटके गाण्यावर रितेश नाचताना दिसतोय आणि धीरजचा मूड आनंदी करण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडिओला रितेशने 'Brother Love' असं कॅप्शन दिलंय. तर व्हिडिओवर 'काम भारी, लय भारी' असं कॅप्शन दिलंय. या मजेशीर व्हिडिओचा रितेशचे फॅन चांगलाच आनंद लुटत आहेत. कालपासून हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओला 698, 390 व्ह्यूज आहेत. 

Vidhan Sabha 2019 : ...आता वेळ आली ती धीरजला घडविण्याची : रितेश देशमुख

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Brother Love @dhirajvilasraodeshmukh

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघ तर धीरज देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे देशमुख बंधूंनी एकत्र उमेदवारी अर्ज भरत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांचे सर्व कुटूंबिय उपस्थित होते. त्यांच्या कुटूंबाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हणले आहे की, 'काल अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरायला जाताना मी लातूरमधल्या लोकांचा उत्साह, त्यांचे आमच्या कुटूंबाप्रती प्रेम बघितले. मला अभिमान वाटतो की मी या कुटूंबाचा भाग आहे. अमित भैय्या आणि धीरज यांना शुभेच्छा! हे दोघेजण लातूरचे खरे नेतृत्व आहे.'  

      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritesh Deshmukh and dheeraj deshmukh tiktok video gets viral