esakal | विलासराव देशमुखांच्या जयंती दिनी अनेकांना जागवल्या आठवणी
sakal

बोलून बातमी शोधा

विलासराव देशमुखांच्या जयंती दिनी अनेकांना जागवल्या आठवणी

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलासराव देशमुखांविषयी आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

विलासराव देशमुखांच्या जयंती दिनी अनेकांना जागवल्या आठवणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा ( Vilasrao Deshmukh Birth Aniversary) आज बुधवारी (ता.२६) ७६ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. बाभळगाव येथील विलासबागेतील त्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण करुन त्यांना कुटुंबीयांच्या वतीने (Latur) अभिवादन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलासराव देशमुखांविषयी आठवणी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत लोकनेते म्हणून ओळख निर्माण केली. राजकीय परिपक्वता, उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेले त्यांचे प्रभावी नेतृत्व महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहिल. स्व.विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. (Vilasrao Deshmukh Birth Anniversary Celebrated)

हेही वाचा: मराठा आरक्षणावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते बोलत नाहीत- संभाजीराजे

साहेब आपल्यात असण्याचा स्पर्श आम्हाला पदोपदी जाणवतो. त्यांचा आशीर्वाद नित्य नवी प्रेरणा देतो. लोकसेवेच्या कार्यात ते आपणा सर्वांसाठी स्फूर्तिस्थान आहेत. त्यांचे कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्या आठवणी नेहमीच नवं बळ देतात. नवा विश्वास देतात, या शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी वडिलांना अभिवादन केले.

प्रिय देवा, कृपया घड्याळाचे काटे मागे फिरव यावेळी. पपा तुमची प्रत्येक दिवशी खूप आठवण येते, वाढदिवसाच्या शुभेच्छा!, या शब्दांत अभिनेता रितेश देशमुख (Actor Riteish Deshmukh) यांनी आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. दुसरीकडे त्यांची सून जेलेनिया देशमुखने (Actress Jenelia Deshmukh) म्हटले, की पपा हॅपी बर्डथे, आम्हा सर्वांना तुमची आठवण येते. वडील-मुलीची गळाभेट अनेक काळासाठी आठवणीत राहिल.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, एक रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्व, अमोघ वक्तृत्वद्वारे जनसामान्यांच्या मनावर आपली छाप सोडणारे, सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास असलेले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख साहेब यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन, अशा भावना ट्विटरवर व्यक्त केल्या.