विलासराव देशमुख यांना अभिवादन, मांजरा कारखान्यात रक्तदान

Vilasrao Deshmukh Jayanti Latur
Vilasrao Deshmukh Jayanti Latur

लातूर : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख, उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी मंगळवारी (ता. २६) कारखाना परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरप्रसंगी ८५ व्यक्तींनी रक्तदान केले.


कारखान्याची उभारणी विलासराव देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली झाली. याच परिसरात त्यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य साधून आणि कोरोनामुळे शारीरिक अंतराचे पालन करून कारखान्याचे अधिकारी, कामगार; तसेच सभासदांनी विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली; तसेच याप्रसंगी कारखान्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरप्रसंगी ८५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

रक्तदानामध्ये कारखान्याचे संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी सहभाग घेतला होता. रक्त संकलनाचे कामकाज भालचंद्र ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केले. यावेळी संचालक अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, धनराज दाताळ, सचिन शिंदे, सूर्यकांत पाटील, नीळकंठ बचाटे पवार, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, नवनाथ काळे, शेरखान पठाण, बाबूराव जाधव, शंकर बोळंगे यांच्यासह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार, कर्मचारी सभासद, ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार, मजूर व हितचिंतक उपस्थित होते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com