जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी उसळला जनसागर

Army Man News Ausa
Army Man News Ausa

औसा (जि.लातूर) ः जम्मू-काश्‍मीर येथील लेह परिसरात कर्तव्य बजावताना अलमला येथील सुरेश चित्ते यांना ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवल्यामुळे वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी (ता.17) त्यांच्या मूळगावी अलमाला येथे आणण्यात आले. सकाळी आठ वाजता चित्ते यांच्या पार्थिव गावात आल्यावर गावातील चौकात अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आले. त्यानंतर गावातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.

या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. "अमर रहे अमर रहे.. सुरेश चित्ते अमर रहे... वंदे मातरम.. भारत माता की जय या घोषणांनी अलमला परिसर दुमदुमून गेला. आपल्या लाडक्‍या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. चित्ते महार बटालियनमध्ये नाईक या पदावर देशसेवा करीत होते. त्यांच्या निवृत्तीला अवघे दीड वर्षे शिल्लक असतांना त्यांना वीरमरण आले.

दोन जुळ्या मुली
अंत्यसंस्कार काय असते? ते कशासाठी असते याचीही कल्पना त्या चिमुकलीला नाही. ती नुसती येणाऱ्या जाणाऱ्याकडे भेदरलेल्या नजरेने पाहत आहे. तिचे वडील कधीही परत न येणाऱ्या प्रवासाला गेला आहे. त्याचीही जाणीव या चिमुकलीला नाही. सुरेश चित्ते यांना दोन जुळ्या मुली आणि चार महिन्यांचा मुलगा आहे.

वर्षभरात 25 हजार दुचाकी रस्त्यावर
लातूर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यामुळे येथे दुचाकींचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. 2019 मध्ये तब्बल 25 हजार दुचाकी रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे लातुरातील रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकींचा आकडा चार लाखांच्या घरात पोचला आहे. एकूण वाहनांपैकी दुचाकींचे प्रमाण जास्त असल्यामुळे लातूरची ओळख दुचाकींचे शहर अशी बनली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लातुरातील अनेक घरांत सध्या दोन दुचाकी पाहायला मिळत आहेत. याबरोबरच बाहेरून येथे शिकायला येणारे विद्यार्थी दुचाकींचा सर्रास वापर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com