बीडमधून क्षीरसागर-मेटे लढणार; जागा कोणाला सुटणार?

दत्ता देशमुख
शुक्रवार, 19 जुलै 2019

बीड: बीड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्रामचे संस्थापक विनाकयक मेटे या दोघांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते लढणार असले तरी महायुतीत ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार असा प्रश्न आहे.

बीड: बीड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्रामचे संस्थापक विनाकयक मेटे या दोघांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते लढणार असले तरी महायुतीत ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार असा प्रश्न आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने त्यांना कॅबीनेट मंत्रीपदही दिले आहे. त्यांनी आता आगामी विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. मंत्रीपद असल्याने आता शासकीय आढावा बैठका सुरु असून पंचायत समिती गणांतही त्यांनी बैठका सुरु केल्या आहेत. तसे, युतीत सुरुवातीपासून जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी बीडची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. त्यामुळे शिवसेनेला जागा आणि जयदत्त क्षीरसागर उमेदवार असा विश्वास त्यांच्यासह समर्थकांना आहे. तर, विनायक मेटे यांचीही मागील विधानसभा निवडणुकीपासून बीडमधून लढण्याची तयारी सुरु आहे. आताही त्यांनी पंचायत समितीचा आढावा, पक्षप्रवेश, विकास कामांचे भूमिपुजने, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन शिबीर असे उपक्रम सुरु आहेत. महायुतीतला घटक पक्षाचे नेते म्हणून ही जागा शिवसंग्रामला सुटेल असा मेटे आणि समर्थकांना विश्वास वाटत आहे. त्यामुळे दोघांचीही जोरदार तयारी असल्याने निवडणुक रिंगणात दोघेही असणार हे निश्चित आहे. मात्र, मात्र, आता जागा कोणाला सुटते आणि अपक्ष रिंगणात कोण राहतो याकडे लक्ष आहे. 

मेटेंचे जागा मिळण्याचे बलस्थान
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना निम्म्या - निम्म्या जागा लढविणार आहे. तत्पुर्वी घटकपक्षांना जागा सोडून उर्वरित जागा भाजप - शिवसेना घेणार आहे. तसेच, घटक पक्षांना जागा देऊन उमेदवारांना भाजपचे चिन्ह देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खेळीनुसार मेटे भाजपचेही चिन्ह घेऊ शकतात. आपण बसतो. तसेच, जागा वाटप करताना विद्यमान भाजप - शिवसेनेचे आमदार असलेल्या जागा त्या - त्या पक्षाला आणि आदलाबदल करायची ठरल्यास काँग्रेस - राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या ठिकाणी मागच्या वेळी दुसऱ्या स्थानावर असलेल्या पक्षाला ती जागा सुटणार आहे. हे तिन फॉर्म्युले विनायक मेटे यांच्या पथ्यावर आहेत. 

जयदत्त क्षीरसागर यांची बदलस्थाने
पक्षप्रवेश करताच शिवसेनेने मास लिडर असलेल्या क्षीरसगारांना ताकद द्यायची म्हणून कॅबीनेटमंत्रीपद दिले आहे. त्यातच युतीत जिल्ह्यातील एकमेव बीड ही शिवसेनेची जागा आहे. मेटेंना जागा भेटू नये यासाठी भाजपचे स्थानिक नेते विरोध करुन ते बळ क्षीरसागरांच्या पारड्यात टाकतील. या सर्व जयदत्त क्षीरसगार यांच्या जमेच्या बाजू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Mete and Jaydutta Kshirsagar Will Fight Beed Assambly Election