विनायक मेटेंना मोठा झटका; दोन झेडपी सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विनायक मेटेंना मोठा झटका; दोन झेडपी सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

बीड : राज्यात महायुतीसोबत व जिल्ह्यात भाजपला विरोध अशी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या दोन समर्थक झेडपी सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गळाला लावले. 

शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून शनिवारी (ता. 23) भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के यांनी मेटे यांची साथ सोडलेली आहे. आता त्यांच्यासोबत केवळ भारत काळे हे एकच सदस्य आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय दुरावा आलेल्या मंत्री पंकजा मुंडे व आमदार मेटे यांच्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या निमित्ताने मनोमिलन झाले. मात्र, जिल्हा परिषदेच्या करभरावरूनच पुन्हा या दोघांत पुन्हा अंतर पडले. अलीकडे या दोघांतील राजकीय संघर्ष टोकाला पोचला. विविध माध्यमांतून दोघे एकमेकांना शह-काटशह देत आहेत.

दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून नेहमी अपमान, निधी वाटपात, विकास कामांत अन्याय होत आहे. त्यांना राजकीय अहंकार असल्याचा थेट टीका करत शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत पण बीडमध्ये विरोधात अशी भूमिका विनायक मेटे यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या भूमिकेला मुंडे यांनी त्यांचेच दोन सदस्य फोडून चांगलाच धक्का दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com