मतदारांनी अवश्‍य लक्ष्मीचे दर्शन घ्यावे - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

पैठण - विरोधक तुम्हा मतदारांना आज रात्रीतून लक्ष्मीदर्शन करवतील. मतदारांनी आलेल्या सर्वांचेच लक्ष्मीदर्शन करून घ्यावे. दारी आलेल्या या लक्ष्मीला परत पाठवू नका, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी दिला. पैठणच्या पालिका निवडणुकीसाठी पैठण (जि. औरंगाबाद) येथे आज भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित समारोप सभेत ते बोलत होते. या वेळी दानवे यांनी विरोधकांकडून लक्ष्मीदर्शन करून घ्यावे आणि मतदान करताना कमळ निशाणीवरील बटण दाबावे, असे आवर्जून सांगितले.

नोटाबंदीबाबत बोलताना ते म्हणाले, की हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याचे दुःख फक्त कॉंग्रेसवाल्यांना झाले आहे. मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे या दुःखाचे सुतक पडले आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालामुळेही त्यांची गोची झाली आहे. या निकालामुळे विरोधक कोणत्याही पातळीवर जात आहेत. सायंकाळी संपलेल्या या सभेनंतर नागरिकांत लक्ष्मीदर्शनाची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करीत विरोधकांवर हल्लाबोल केला.

Web Title: voter darshan laxmi