परभणी जिल्हा परिषदेत त्रिशंकु स्थिती

गणेश पांडे
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच बोलबाला
जिल्ह्या परिषद गटात सर्वाधिक जागा जिंकणारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष पंचायत समितीमध्येही मोठा पक्ष ठरला आहे. नऊ पैकी पाथरी, जिंतूर, सेलू व सोनपेठे या चार पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने स्पष्ट बहूमत मिळविले आहे. तर उर्वरित परभणी व मानवत येथे शिवसेना तर गंगाखेड, पालम व पूर्णेा या तीन ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती आहे.

परभणी - यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी व युतीत फुट पडल्याने येथील जिल्हा परिषदेची स्थिती त्रिशंकु झाली आहे. सर्वाधिक 24 जागा मिळवून राष्ट्रवादी कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्यांना सत्तेत बसण्यासाठी इतर उमेदवारांच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचा समविचार पक्ष असलेल्या कॉग्रेसची मात्र जिल्ह्यात पूर्णत: वाताहात झाली आहे. शिवसेना व भाजपाला ही गतवेळी पेक्षा जादा जागा मिळाल्या आहेत.

परभणी जिल्हा परिषदेची निवडणुक सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. 54 जागा पैकी 24 जागावर विजय संपादन करून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्या खालोखाल शिवसेना 13, कॉग्रेस सहा, भारतीय जनता पक्ष पाच, राष्ट्रीय समाज पक्ष तीन, तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत. गतवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसची जिल्हा परिषदेत सत्ता होती. त्यांचेच राजेश विटेकर हे अध्यक्ष होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसची जिल्हा परिषेदवर एक हाती सत्ता होती. यंदा कोणतीही युती व आघाडी नसल्याने ही निवडणुक चौरंगी झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यासह तीन ते चार मंत्री, राजकीय पक्षाचे मोठ - मोठे नेत्यांच्या सभानी प्रचाराचे दिवस गाजले गेले. ही जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार संजय जाधव, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, आमदार विजय भांबळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, शिवसेनेचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. परंतू प्रत्येक पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षांच्या उमेदवारांना ही निवडणुक अत्यंत जड गेली.

पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यापेक्षा पक्षातील दुसऱ्या गटातील उमेदवाराला पाडायचे कसे या प्रयत्नामुळे कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. शिवसेनेत हा प्रकार जास्त पहावयास मिळाला. दुसरीकडे कॉग्रेसला स्वताची पत राखता आली नाही. जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचा गड असलेल्या लोहगाव गटात शिवसेनेच्या अजंली पतंगे निवडून आल्या आहेत. जिंतूरात कॉग्रेसचे माजी आमदार कुंडलीकराव नागरे यांच्या सुनबाई अमृता नागरे यांना पराभव स्विकारावा लागला. याच ठिकाणी कॉग्रेसचे बलाढ्य नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा प्रभाव पूर्णत: संपूष्ठात आला आहे. या तालुक्यातील एकाही गटात कॉग्रेसला यश आले नाही. या तालुक्यात दहा पैकी 9 जागा राष्ट्रवादी कॉग्रेसने मिळविल्या आहेत. येथे विद्यमान आमदार विजय भांबळे यांचा प्रभाव वाढला आहे असेच म्हणावे लागेल.

पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच बोलबाला
जिल्ह्या परिषद गटात सर्वाधिक जागा जिंकणारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष पंचायत समितीमध्येही मोठा पक्ष ठरला आहे. नऊ पैकी पाथरी, जिंतूर, सेलू व सोनपेठे या चार पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने स्पष्ट बहूमत मिळविले आहे. तर उर्वरित परभणी व मानवत येथे शिवसेना तर गंगाखेड, पालम व पूर्णेा या तीन ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती आहे.

पक्षीय बलाबल (कंसातील आकडे गतवेळेचे आहेत)
एकूण जागा - 54

राष्ट्रवादी कॉग्रेस - 24 (25)
शिवसेना - 13 (11)
कॉग्रेस - 06 (08)
भाजप - 05 (02)
रासप - 03 (01)
अपक्ष - 02 (01)
घनदाट मित्रमंडळ - 01 (03)

#VoteTrendLive

Web Title: #VoteTrendLive parbhani Zp election