esakal | वाबळेवाडी पॅटर्नला अखेर परभणीत स्थगिती...
sakal

बोलून बातमी शोधा

e learning

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या वाबळेवाडी पॅटर्नला तूर्त स्थगिती दिल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.अकरा) रात्री निर्गमित केले. त्यासाठी खासदार फौजिया खान यांची शिष्टाई कामा आली. 

वाबळेवाडी पॅटर्नला अखेर परभणीत स्थगिती...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या वाबळेवाडी पॅटर्नला तूर्त स्थगिती दिल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.११) रात्री निर्गमित केले. त्यासाठी खासदार फौजिया खान यांची शिष्टाई कामा आली.
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वाबळेवाडी-परभणी पॅटर्न राबविण्याचे आदेश (ता.सहा) जुलै रोजी निर्गमित केले होते. त्यानुसार ‘ग्रुप लर्निंग फ्रॉम होम’ स्वयंअध्ययन अभ्यास गट हा उपक्रम राबविला जात होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा गटाला थेट शिक्षक मार्गदर्शन करत होते. उपक्रम जरी चांगला असला तरी तो राबविण्याची सद्यस्थिती नाही, अशी कुरकुर शिक्षक वर्गातून उमटत होती. याबाबत विविध शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आहे. 

हेही वाचा - संचारबंदी लागू केल्याने नांदेडकरांची जबाबदारी वाढली

पॅटर्न राबविण्याची सद्यस्थिती नाही 
प्रमुख शिक्षक संघटनादेखील भीतीने धजावत नव्हत्या. परंतू, जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेसह, माध्यमिक शिक्षक संघाने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्याचे धाडस केले होते. पाठोपाठ खासदार फौजिया खान यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना पत्र दिले. वाबळेवाडी पॅटर्न हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, परंतू, त्याला राबविण्याची सद्यस्थिती नाही असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. 

हेही वाचा - परभणीला धक्का : गंगाखेड शहरात २४ तासात २० कोरोनाग्रस्त

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश 
या पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पृथ्वीराज यांना एका आदेशाद्वारे या उपक्रमाला तूर्त स्थगिती दिल्याचे कळविले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपले (ता.सहा) जुलै रोजीचे पत्र शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवण्यात आलेले असून तूर्त या उपक्रमाला स्थगिती देत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.


खासदार फौजिया खान यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
जिल्हा परिषदेच्या सीईओंनी जिल्हा परिषद शाळेत वाबळेवाडी पॅटर्न राबविण्याचे आदेश दिले आहेत. परंतू सद्यस्थितीत हा निर्णय योग्य नसून त्यामुळे सदरील योजना येणाऱ्या काळात परिस्थिती पाहून राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार प्रा. फौजिया खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

(संपादन ः राजन मंगरुळकर)

loading image