जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

बीड - काही काळ उघडीप दिलेल्या वरुणराजाने सोमवारी (ता. चार) जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावली. कुठे मध्यम तर कुठे रिमझिम पाऊस झाला. बीड परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. बीड शहरात दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. माजलगाव शहर तालुक्‍यातील काही भागांत सकाळीच पावसाने हजेरी लावली. आष्टी तालुक्‍यातही सकाळी सर्वदूर रिमझिम सुरू होती. धारूर व परिसरातही रिमझिम पाऊस झाला. पाटोदा तालुक्‍यातील डोंगरकिन्ही भागातही पावसाने हजेरी लावली. कडा व परिसरातही पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या. माजलगाव तालुक्‍यातील राजेगाव, तालखेड भागातही पावसाने हजेरी लावली. नेकनूर भागातही काही काळ मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. केज तालुक्‍यातही पावसाने हजेरी लावली. पाटोदा व गेवराई शहरातही हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. सिरसाळा परिसरातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. माजलगाव तालुक्‍यात सायंकाळीही पाऊस झाला. दरम्यान, काही काळ उघडीप दिलेल्या पावसाने हजेरी लावली असली तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Waiting for a rainfall in the district