
Walmik Karad: बीडमधल्या सर्वसामान्यांची धाकधूक वाढवणारी बातमी म्हणजे गोट्या गित्तेचा मकोका रद्द करण्यात आला. आता हे प्रकरण नेमकं काय समजून घेणं महत्त्वाचं आहे. बीड जिल्ह्यातील परळीतल्या सहदेव सातभाईंवर खुनाच्या प्रयत्न आणि लुटीच्या प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. या प्रकरणात एकूण सात जणांना आरोपी करण्यात आलं होतं. पण आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे कारण, अप्पर पोलिस महासंचालकांनी या टोळीतील पाच आरोपींवरील मकोका (MCOCA) रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.